जिल्हा परिषद प्राथमिक शाळा गोडसेवस्ती येथे अनोखी होळी व आंतरराष्ट्रीय महिला दिन उत्साहात साजरा करण्यात आला.
पिलीव/प्रतिनिधी
आज सोमवार दिनांक 9/ 3 /2020 माळशिरस तालुक्यातील शिंगोर्णी येथील गोडसेवस्ती शाळेतील विद्यार्थ्यांनी शालेय परिसरातील केरकचरा गोळा केला. प्लॕस्टीक कागद , कागदी पत्रावळ्या, कागदी कप,कचरा, कागदाचे तुकडे ,खराब वैरणीचे ताटे एकत्र करून होळी तयार केली. होळीच्या पवित्र अग्निमध्ये वाईट विचार ,चालीरितींचा, निराशा , दारिद्रय , आळस,खोड्या करणे,भांडण ,अभ्यास न करणे, गैरहजर राहणे, खोटे बोलणे,चोरी करणे अशा विचारांचे दहन करून नायनाट करण्याचे आवाहन केले.तसेच नव्या विचारांचा अवलंब करणे, आई- वडिलांची सेवा करणे , आदर करणे, नोकरी मिळेल इतके शिक्षण घेणे, उच्च शिक्षण घेऊनही शिक्षक, डॉक्टर, वकील , पोलीस, इंजिनिअर इ.होणार असा संकल्प सर्व विद्यार्थ्यांकडून करून घेतला . वृक्षारोपण व वृक्षसंवर्धनाचे महत्व पटवून दिले.

उन्हाळ्यात घ्यावयाची काळजी व या अनोख्या आधुनिक होळी विषयी शाळेचे मुख्याध्यापक श्री. सर्जेराव शिंदे सर माहिती सांगितली .
व श्रीमती.सोनार मॅडम यांनी भारताच्या पहिल्या स्त्री शिक्षिका सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करून आंतरराष्ट्रीय महिला दिन साजरा केला. मुलींना स्वसंरक्षण विषयी माहिती सांगितली तसेच आज महिला प्रत्येक क्षेत्रांमध्ये पुढे आहेत याविषयी माहिती सांगितली व सर्व मुलींचे मनोबल वाढवले व शिक्षण या विषयावर शाळेतील सर्व मुलींना मार्गदर्शन केले.