निमगाव मध्ये ज्येष्ठ स्वातंत्र्य सेनानी श्रीमती विमलताई नगरकर यांची पुण्यतिथी साजरी व महिला दिन साजरा

पिलीव / प्रतिनिधी

जवाहर शिक्षण प्रसारक मंडळ निमगाव संचलित

निमगाव विद्यामंदिर व ज्युनिअर कॉलेज निमगाव (म)
ता माळशिरस या प्रशालेत संस्थेच्या संस्थापक सचिव व ज्येष्ठ स्वातंत्र्यसेनानी
श्रीमती विमलताई नगरकर यांच्या 6 व्या पुण्यतिथीनिमित्त प्रशालेच्या वतीने त्यांना आदरांजली वाहण्यात आली यावेळी नगरकर यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ प्रशालेच्या आवारात लावण्यात आलेले स्मृती वृक्षाचे पूजन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले तसेच जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून प्रशालेतील सर्व महिला शिक्षीकांचा यथोचित सन्मान करण्यात आला याप्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष स्थानी संस्था संचालक संभाजीराव मगर होते ,तसेच या कार्यक्रमासाठी संस्थेचे अध्यक्ष श्रीनिवास इनामदार ,निमगाव चे माजी सरपंच हनुमंतराव पवार संस्थेचे उपाध्यक्ष महादेवनाना मगर सहसचिव बबनराव जाधव ,सौ सुश्रीया इनामदार , प्रशालेचे प्राचार्य भिमराव जाधव , पर्यवेक्षक मोहन देशमुख,राजेश सुरवसे, प्रा सचिन मगर,प्रा चिंतामणी मगर, उपस्थित होते

या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन इयत्ता आठवी ब मधील कु.गौरी बोडरे कु.संध्या पवार कु.ज्ञानेश्वरी मगर यांनी केले तर प्रस्ताविक कु.पायल मगर हिने केले याप्रसंगी कु.ऋतुजा साठे कु.वैभवी मगर कु. श्रुती सुतार या विद्यार्थ्यांनी आपले मनोगत व्यक्त केले तर कु.मधुरा मगर हिने आभार मानले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *