पोलीस अधिक्षक यांनी अँट्रोसिटी कायद्यातील तरतुदींची अंमलबजावणी करावी:-आजिनाथ राऊत

काल दि.05/03/2019 रोजी अनुसुचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंधक कायदा 1989 नियम 1995 संशोधित अधिनियम 2015 मधील अपर पोलीस महानिरीक्षक ना.ह.स.महाराष्ट्र राज्य मुंबई यांनी दि.10/07/2007 रोजी काढलेले परीपञक सर्व विभागांना पाठवुन अंमलबजावणी करण्याचे आदेश दिलेले आहेत,तरीसुध्दा अँट्रोसिटी कायद्यातील परीपञकांची अंमलबजावणी होत नाही असे दिसुन येते,अनुसुचित जाती जमातीतील तक्रार देण्यासाठी आलेल्या व्यक्तीस नमस्कार,जय हिंन्द,जय महाराष्ट्र म्हणावे,फिर्यादी व सोबत आलेल्या व्यक्तीस सुस्थितीत असलेली खुर्ची बसण्यास द्यावी.
तक्रारदार पोलीस स्टेशनला आल्यावर तक्रारदाराला स्वच्छ ग्लासमध्ये पिण्याचे पाणी द्यावे या तरतुदींसह परीपञकातील इतर सर्व सुचनांसह या परीपञकाची जिल्हा पोलीस अधिक्षक यांनी तात्काळ दखल घेऊन काटेकोरपणे अंमलबजावणी करावी अशी मागणी नँशनल दलीत मुव्हमेंट फाँर जस्टिस संघटनेच्या वतीने आजिनाथ अंगद राऊत जिल्हाध्यक्ष उस्मानाबाद यांनी मा.पोलीस अधिक्षक.ए.आर.राजा.साहेब यांना प्रत्यक्ष भेट घेऊन सोबत निवेदन व परीपञकाची प्रत जोडुन देवुन,
सर्व विभागांना सदर परीपञकाची प्रत पाठवुन कायद्याची काठेकोरपणे अंमलबजावणी करण्याच्या सुचना द्याव्यात अशी मागणी निवेदनाव्दारे केली आहे…….

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *