महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वरती आत्महत्येस परावृत्त केल्याचा गुन्हा दाखल करावा—किरण साठे
प्रतिनिधी—सोलापूर
मातंग समाजाला लोकसंख्येच्या प्रमाणात आरक्षण मिळावे या मागणीसाठी बीड जिल्ह्यामध्ये मातंग समाजाचे संजय ताकतोडे यांनी जलसमाधी घेऊन आपले जीवन संपवले आहे,या प्रकरणाला जबाबदार धरून मुख्यमंत्री यांच्यवरती आत्महत्येस परावृत्त केल्याचा गुन्हा दाखल करावा अशी मागणीउपविभागीय अधिकारी माळशिरस विभाग अकलूज यांच्यामार्फत राज्यपालांना पाठवलेल्या निवेदनांमध्ये मनसे जिल्हाउपाध्यक्ष व बहुजन ब्रिगेडचे अध्यक्ष किरण साठे यांनी केली आहे, महाराष्ट्र राज्यामधील मातंग समाजाला लोकसंख्येच्या प्रमाणात आरक्षण देण्याच्या मागणीसाठी अनेक आंदोलने,मोर्चे काढण्यात आले,मात्र देवेन्द्र फडणवीस व भाजप सरकारने आरक्षणाचा मुद्यावर अनेक वेळा आश्वासने दिली मात्र ती पाळली नाहीत,या मातंग समाजाला लोकसंख्येच्या प्रमाणात आरक्षण देण्यात यावे या मागणीसाठी बीड जिल्ह्यामध्ये मातंग समाजाचे संजय ताकतोडे यांनी जलसमाधी घेऊन आपली अंत्ययात्रा संपवली आहे,याला जबाबदार म्हणून या महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वरती आत्महत्येस परावृत्त केल्याचा गुन्हा दाखल करावा व संजय ताकतोडे यांच्या कुटूंबाला सरकारने शासकीय मदत त्वरित जाहीर करावी अशी मागणी मनसे जिल्हाउपाध्यक्ष व बहुजन ब्रिगेडचे अध्यक्ष किरण साठे यांनी राज्यपाल यांना पाठवलेल्या निवेदनांमध्ये केली आहे,यावेळी बहुजन ब्रिगेड तालुकाध्यक्ष आकाश होनमाणे,बहुजन ब्रिगेड अकलूज शहराध्यक्ष आनंद मिसाळ,मनसे अकलूज शहराध्यक्ष सुदाम आवारे,बहुजन ब्रिगेड तालुका संपर्क प्रमुख उदय कांबळे,बहुजन युवा शहराध्यक्ष कन्हैया ठोंबरे,बहुजन,वैभव एकतपुरे,किरण एकतपुरे,बाळू शिंदे,बापू कांबळे इत्यादी उपस्थित होते.
चौकट
जे समाज आरक्षणाच्या मागणीसाठी आंदोलने,मोर्चे काढून शासन दरबारी आपली भूमिका मांडत आहेत,त्याना आरक्षण दिले जात नाही,आणि ज्यांनी आरक्षण मागितले नाही त्यांना तुम्ही आरक्षण देता ही निंदनीय गोष्ट आहे,म्हणून मातंग समाजाला माझी विनंती आहे, आपल्या समाजातील संजय ताकतोडे यांनी भाजप सरकारने आपली आरक्षणाची मागणी मान्य केली नाही म्हणून जलसमाधी घेतली आहे,त्या सरकारला खाली खेचण्यासाठी येत्या निवडणुकीमध्ये भाजपला मतदान करू नका हीच आपल्या संजय ताकतोडे यांना श्रद्धांजली असेल
किरण साठे—मनसे जिल्हाउपाध्यक्ष व अध्यक्ष बहुजन ब्रिगेड