स्त्रिया, मानवमुक्ती लढ्याच्या अग्रदूत होतील
शिवाजी राऊत
पाचवड दिनांक २२ :”जगभरात स्त्रिया याच आता सत्तास्थानी येतील . जगात सर्वत्र मानव हिंसेची शिकार स्त्रीच झाली आहे .स्रियांना जात नाही .धर्म नाही, वंश नाही . पुरुष सत्ताक व्यवस्थेने त्यांना बंदिस्त करून टाकले आहे .स्त्रियांनी हिंसेचे आघात पचविले आहेत .दुष्काळ ,आत्महत्या ,बेकारी ,दारिद्र्य ,भूक ,यात स्त्रियाच बळी जास्त ठरल्या आहेत .स्त्री ही अहिंसावादी आहे .स्त्री ही सृजन आहे .या पुढे जगात स्त्रियांच्या स्वातंत्र्याची चळवळ उभी राहील .या पुढील काळात स्त्रिया याच मानवमुक्तीच्या लढ्याच्या अग्रदूत होतील .फक्त त्यांनी स्वतःची ओळख करून घ्यायला पाहिजे .क्षमता कळून घेतली पाहिजे. त्या मानव मुक्तीच्या लढ्याच्या महानायिका आहेत ‘’ असे मत आर. .टी. आय .कार्यकर्ते प्राचार्य शिवाजी राऊत यांनी व्यक्त केले .,ते येथील रयत शिक्षण संस्थेच्या यशवंतराव चव्हाण महाविद्यालयात मराठी विभागाने मानवी हक्क कोर्स अंतर्गत आयोजित केलेल्या“मानवी हक्क व माहितीचा अधिकार अंमलबजावणीत युवकांची भूमिका “’या कार्यशाळेत बोलत होते .अध्यक्षस्थानी प्रा.गणेश तारू होते .प्राचार्य .डॉ राजीव बावधनकर यांच्या मार्गदर्शनाने या कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते .कार्यशाळेचे समन्वयक , मराठी विभाग प्रमुख प्रा सुभाष वाघमारे यांनी कार्यशाळेचे नियोजन केले होते
प्रारंभी मानवी हक्क सत्रात त्यांनी जागतिक मानवी हक्काच्या जाहीरनाम्यातील कलमे व भारतीय संविधानातील मानवी हक्क विषयीचे अधिकार याबाबत माहिती दिली .भारतातील सद्यस्थिती बद्दल बोलताना ते म्हणाले की ‘’भारतामध्ये स्वातंत्र्याचा अवकाश राजकीय पातळीवर आहे .पण आपणास असे आढळते की, ही व्यवस्था स्वातंत्र्य दडपू पाहत आहे .भारतात अहिंसा असली तरी भारत हे हिंसेचे ठिकाणही आहे .हिंसेचा इतिहास समजावून घेऊन अहिंसा आणण्यासाठी काम केले पाहिजे .इतिहासात हिंसा जास्त आहे .स्रिया अहिंसक आहेत त्यांनीच आता बंधुभाव वाढविण्यासाठी मानवमुक्तीच्या नायिका झाले पाहिजे .असेही ते म्हणाले .शबरीमल मंदिरात गेलेल्या कनकप्रिया व बिंदू यांना सलाम केला पाहिजे . धर्म व्यवस्थेचा एवढा विरोध असताना त्यांनी आपला हक्क बजावला .म्हणून त्या मानवी हक्काच्या महानायिका आहेत .देशात लोक धर्माला रस्त्यात आणतात .हे चांगले नाही .भारत हा धर्मनिरपेक्ष देश आहे .प्रत्येकाला उपासना स्वातंत्र्याचा अधिकार आहे पण कायदा आणि सुव्यवस्थेचे पालन केले पाहिजे ..असे ते म्हणाले .या वेळी त्यांनी अन्न अधिकार ,घराचा अधिकार ,आरोग्य अधिकार ,जगण्याचा अधिकार ,शिक्षणाचा अधिकार .इ.अधिकार व भारतीय घटनेतील हक्काचे व स्वातंत्र्याचे विवेचन केले .लिंग ,वंश ,भाषा ,धर्म ,जात या वरून भारतात भेदभाव जास्त असल्यामुळे मानवी हक्कांचे सतत उल्लंघन होतेय असेही ते म्हणाले .
दुसऱ्या संत्रात त्यांनी केंद्रीय माहितीचा अधिकार २००५ ची माहिती देऊन ,त्यांनी माहितीचा अधिकार वापरण्यासाठी अर्ज कसा करावा हे कार्यशाळेत प्रशिक्षण देऊन ,विद्यार्थ्याकडून अर्ज भरून घेतले .या कार्यशाळेत उत्कृष्ट अर्ज तयार करणाऱ्या वैष्णवी गायकवाड व निशा आवळे यांचे त्यांनी कौतुक केले .तसेच दीप्ती संकपाळ व …तनुजा पवार .यांना ज्ञानरचनावाद पुस्तके भेट दिली .यशवंतराव चव्हाण महाविद्यालयाच्या ग्रंथालयास त्यांनी ,ज्ञानरचनावाद,सत्त्योतर रचनावाद ,व कॉलम ऑफ थॉट ही पुस्तके भेट दिली .
कार्यशाळेच्या समारोप समारंभात
प्रा .राजेंद्र देशमुख म्हणाले की .माहितीचा अधिकार अंतर्गत माहिती मागवताना नियमानुसारच मागवावी .माहितीचा दुरुपयोग करू नये .तसेच आपल्या हक्काची काळजी घेताना दुसऱ्याच्या हक्कांचा आदर केला पाहिजे .
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक मराठी विभाग प्रमुख प्रा.सुभाष वाघमारे यांनी केले .सूत्र संचालन प्रा. तृप्ती नाईक यांनी केले .या कार्यक्रमास प्रा.सलीमशेख ,प्रा .आर .आर. जाधव व प्रा.प्रदीप शिंदे ,व मानवी हक्क कोर्सचे विद्यार्थी हजर होते .याच कार्यक्रमात मानवी हक्काची पायमल्ली कशी केली जाते याची ध्वनी चित्रफीत दाखवण्यात आली .