विद्यार्थ्यांनी शिवाजी महाराजासारखा आदर्श पुत्र होण्याचा संकल्प करावा—– डॉ.कुमार लोंढे
माळशिरस तालुक्यातील चांदापुरी येथे सोशल संस्था ,सदाशिवदेठे निवासी प्रशाला व ज्यु .कॉलेज ,डायमंड इंटरण्यष्णल इंग्लिश स्कूल वतीने सुटीच्या दिवशी शाळा घेऊन जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.
यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष सांगली जिल्याचे कराटे प्रशिक्षक विवेकानंद जितकर तर प्रमुख पाहुणे आंतरराष्ट्रीय कराटे प्रशिक्षक पोपट वाघमारे उपस्थित होते .यावेळी संस्थेचे अध्यक्ष डॉ.कुमार लोंढे म्हणाले ” छत्रपती शिवाजी महाराजांनी बारा बलुतेदार ,अठरा पगड जाती,बहुजन समाज यास संघटित करून मावळा ही पदवी दिली त्यांनी कधी जाती- धर्माचे भांडवल केले नाही.त्यांची तलवार जावळीचे मोरे,कृष्णाजी कुलकर्णी व औरंग्या करिता सुद्धा चालली हा इतिहास आपण विसरता कामा नये.त्यांना समता ,बंधुता,न्याय ही शिकवण राजमाता जिजाऊ ने दिली आणि हाच आदर्श विद्यार्थ्यांनी डोळ्यासमोर ठेवला पाहिजे असे परखड मत त्यांनी व्यक्ती केले
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा.साठे यांनी मानले तर सोशल चे आर्शिद पठाण यांनी आभार व्यक्त केले