अतुल नष्टे यांची भाजपा ओबीसी मोर्चा तालुका उपाध्यक्षपदी निवड

पिलीव/टिम
माळशिरस तालुक्यातील पिलीव येथील पत्रकार अतुल श्रीकांत नष्टे यांची माळशिरस तालुका भाजपा ओबीसी मोर्चाच्या तालुका उपाध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे. त्याना निवडीचेपत्र जिल्हाध्यक्ष बाळासाहेब वावरे यांचे हस्ते देण्यात आले. यावेळी बाळासाहेब वावरे, सचिन भैस, नानासाहेब देशमुख, सुभाष गोसावी, पांडूरंग गोसावी किसन जामदार ,अविनाश घमीरे आदी उपस्थित होते. या निवाडी बद्दल संग्राम दोस्ती मंडळाच्यावतीने त्यांचा यथोचित सत्कार करण्यात आला. यावेळी सरपंच संग्राम पाटील, अरिफखान पठाण, रामचंद्र देशमुख,याकूब सय्यद, अमिनखान पठाण, सालार पठाण,अतुल भैस, संतोष खेत्रे, शशिकांत लोखंडे, युवराज गायकवाड, शकील शेख रणजित काळे, सुरज कस्तूरे आदि कार्यकर्ते उपस्थित होते.सरकारने गेल्या साडेचार वर्षांत मोठ्या प्रमाणावर विकास कामे केली आहेत. रस्ते, वीज पुरवठा आदी कामे सुरू आहेत. सरकारने केलेल्या विकासकामांची माहिती जनतेपर्यंत पोहचविणार असल्याचे अतुल नष्टे यांनी निवडीनंतर सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *