यशवंतराव चव्हाण महाविद्यालयात पारंपरिक दिन उत्साहात साजरा…!

पाचवड दिनांक 16
येथील रयत शिक्षण संस्थेच्या यशवंतराव चव्हाण महाविद्यालयात कला व सांस्कृतिक विभागामार्फत शनिवारी पारंपरिक दिन उत्साहाने साजरा करण्यात आला. या पारंपरिक दिनात विद्यार्थिनींचा मोठा सहभाग होता, पारंपरिक दिन कार्यक्रमाचे नियाजन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ राजीव बावधनकर यांच्या मार्गदर्शनाने महाविद्यालयात करण्यात आले.
प्रारंभी महाविद्यालयातील जेष्ठ प्रा.गणेश तारू, व प्रा राजेंद्र देशमुख यांनी पारंपरिक दिन कार्यक्रमाचे उद्घाटन केले, संस्कृती व इतिहासातील चांगल्या परंपरा आपण पुढे नेल्या पाहिजेत, आणि जतनही केल्या पाहिजेत असे मत यावेळी प्रा गणेश तारू यांनी व्यक्त केले. प्रा राजेंद्र देशमुख म्हणाले की विविध संस्कृतीचा परिचय आपण करून घेतला पाहिजे,
कला सांस्कृतिक विभागप्रमुख प्रा सुभाष वाघमारे यांनी प्रास्ताविक केले, ते म्हणाले की हजारो वर्षापासून चालत आलेल्या लोक- परंपरा, काय आहेत, याचा बारकाईने शोध घेतला पाहिजे. भारत हा विविध संस्कृती व तत्वज्ञान यांनी नटलेला सर्व जगातील कदाचित एकमेव देश आहे, जात आणि धर्मांचे अभिनिवेश न बाळगता आपण संस्कृती दर्शन घडवित राहिले पाहिजे आणि परंपराची चौकशी केली पाहिजे, परंपरेत संस्कृतीच्या प्रत्येक विधीत भावना असतात. भक्ती, मुक्ती, शांती, आनंद,वैराग्य, समता, दया, करूणा, विवेक, या बरोबरच उपदेश आणि संदेशही असतात, संस्कृती समजून घेताना मानवी विविध भावनांची समज माणसाला होते, परंपरेत, संस्कृती, कला,नाट्य, इतिहास, तत्वज्ञान यांचा सुंदर समन्वय असतो,आपण डोळसपणे निरीक्षण करून चांगल्या परंपराचे जतन केले पाहिजे असे ते म्हणाले.

पारंपरिक दिन कार्यक्रमाची सुरूवात प्रगती जंगम, नेहा परामणे, नंदिनी सापते, प्रीती गोंधळी, सफिया शेख मनाली मोरे, कोमल निकम, यांनी तयार केलेल्या बारशाच्या विधी पासून झाली, यावेळी विद्यार्थिनीनी हुबेहूब नाट्य उभे केले, बारशाला, आलेल्या स्रिया बाळाला नावे ठेवतात, पाळण्यातल्या बाळाला पाळण्याच्या खालून वरून देत, राम घ्या लक्ष्मण घ्या, शंभू घ्या, वैगैरै म्हणतात, पाळणा गीत गातात या, वैगैरै विधी नाट्य उभे केली, प्रेक्षक असलेल्या मुलींनी त्यांना चांगली दाद दिली, त्या यानंतर याच मुलींनी फँशन शो सादर करताना पारंपरिक साड्या घालून रँम्पवर चालण्याचा अभिनय केला, त्यामुळे कार्यक्रमाचे सौंदर्य आणखीनच वाढले, त्यानंतर वाणिज्य शाखेतील विद्यार्थिनींनी खूपच चांगले नृत्य सादर केले, विद्यार्थनीनी लेझीम नृत्य सादर केले, शिवजयंती निमित्त अानंदाने लेझीम नृत्य करणारया विद्यार्थिनी, रचना शिंदे, भाग्यश्री शिंदे, मृणाली शिंदे, तनुजा जाधव, तेजस्विनी शिवथरे, प्रतिक्षा बाबर, प्रतिक्षा मोतलिंग, पुजा चिकणे, व सोनल शिंदे यांनी या गीत नृत्यात सहभागी झाल्या. शौर्य आणि धैर्य नृत्यातून प्रकट करीत होत्या, विशेष म्हणजे भगवे ध्वज ही हातात घेऊन डौलाने फडकवीत होत्या,. यानंतर दक्षिण भारतीय स्रियांची वेशभूषा सादर करण्यात आल्या,यात सीता पवार, गीता पवार, मनिषा जरड,दिपाली कदम, प्रियंका बाबर, स्वरांजली शिंदे, श्वेता चव्हाण, प्राजक्ता तरडे, पूजा शिंगटे, पूजा इथापे, तृप्ती महाडीक, श्वेता पवार, प्रांजन हिंगमिरे, रोहिणी शेलार, अश्विनी गुरव यांनी सहभाग घेतला

त्यानंतर एक मोठा कार्यक्रम घेण्यात आला, पंढरीला चाललेली वारकरयांची दिंडी आणि सोबत पालखी हे दृश्य खूपच भारावून टाकणारे होते, टाळ वाजवणारया मुली, डोईवर तुळस घेऊन चालणारया या स्रिया दाखवण्यात आल्या, टाळ मृदुंगाच्या तालावर नाचत गात देहभान हरपून भक्तीत मग्न झालेला वारकरी मुलींनी उभा केला, ययातील नृत्यामध्ये होत जाणारे बदलही त्यानी दाखवले,या दिंडी व पालखी कार्यक्रमात वेदिका हिरवे, आरती भिसे, अश्विनी रोकडे, प्राजक्ता जांभळे, प्रियांका तरडे, सुषमा पवार, काजल करंजकर, सुहासिनी दिघे, धनश्री जगताप, अमृता रांजणे, निलम यादव, अादिका तरडे, पूजा गोळे, शामल गोळे, अपेक्षा शेवते, अश्विनी शिंदे, व वाणिज्य शाखेतील विद्यार्थिनीं सहभागी झाल्या. गावोगावी वारकरी यांचे स्वागत होते, ते पायावर पाणी आोतून बनसोडे मँडमनी दाखवले, माऊली माऊली ही ,आत्मीय भावना प्रकट झाली पालखीचे स्वागत कला सांस्कृतिक विभागप्रमुख प्रा सुभाष वाघमारे यांनी केले, विद्यार्थ्यानी या सादरीकरणास चांगली दाद दिली,
राजघराण्यातील स्रियांचा पेहराव वाणिज्य विभागातील विद्यार्थिनी स्वप्नाली पार्टे, स्नेहल निवळे, शिवानी गोळे, रिमा पवार कोमल पोफळे, सादर केला. शेवटी दांडिया नृत्य सादर करण्यात आले,यात काजल जाधव, अक्षदा जाधव, पूजा भोसले, शीतल पिसाळ, स्वप्नाली काळगे, दिपाली मांढरे, सना शेख, कविता जाधव, चैत्राली बाबर, यांनी दांडिया नृत्यात सहभाग घेतला. वाणिज्य शाखेतील विद्यार्थिनींचे कार्यक्रम बसवून त्यांची तयारी करून घेण्यासाठी प्रा इंद्रजीत एेवळे यांनी विशेष परिश्रम घेतले व मार्गदर्शन केले, तसेच कार्यक्रमाचे सूत्र संचालन केले. सांस्कृतिक विभाग समितीतील प्रा.जे एल बनसोडे, प्रा स्मिता पाटोळे, प्रा राणी शिंदे, प्रा.तृप्ती नाईक, महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक, प्रशासकीय सेवक यांनी हा कार्यक्रम चांगला होण्यासाठी सहकार्य केले, या कार्यक्रमाचे काँलेज अंतर्गत परीक्षण, प्रा,. डी. एस. भाडळकर, प्रा डी. डी. घोलप, प्रा. तृप्ती नाईक यांनी केले कार्यक्रमाच्या नंतर देशात पुलवामा येथे घडलेली घटना, देशातली परिस्थिती या बाबत विद्यार्थ्याना माहिती देऊन सजग करण्यात आले, परंपरा समजून घेताना जबाबदार नागरिक म्हणून आपली कर्तव्ये कोणती याचे भान ठेवावे असे आवाहन करण्यात आले, अतिरेकी हल्ल्यात शहीद झालेल्या जवानाना श्रध्दांजली अर्पण करण्यात आली, राष्ट्रगीत झाल्यानंतर कार्यक्रम सांगता झाली

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *