जलयुक्तमध्ये माळशिरस तालुक्यातील गावे घेण्याबाबत लवकरच बैठक घेऊ – ना.सदाभाऊ खोत
पिलीव/सुजित सातपुते
माळशिरस तालुक्यातील गांवे जलयुक्त शिवारासाठी घेण्याबाबत मुख्यमंत्री,महसूलमंत्री ,
कृषिमंत्री व अधिकार्यांसमवेत लवकरच बैठक लावण्याचे आश्वासन राज्याचे कृषी राज्यमंत्री सदभाऊ खोत यांनी तालुक्यातील शिष्टमंडळाला दिले.
माळशिरस भाजपा तालुकाध्यक्ष सोपान नारणवर,धनगर समाजाचे नेते हणमंतराव सुळ,पंचायत समितीचे सदस्य अजय सकट,माऊली पाटील,नातेपुतेचे सरपंच अड बी वाय राऊत,दादासाहेब उराडे यांनी कृषी राज्यमंत्री सदभाऊ खोत यांची भेट घेऊन तालुक्यामध्ये सध्या मोठ्या प्रमाणावरदुष्काळ जाणवत आहे त्यामूळे भविष्यात पाण्याची टंचाई निर्माण होऊ नये यासाठी जलयुक्त शिवारामधून कामे झाल्यास येणारया काळात हा पाण्याचा प्रश्न निर्माण होणार नाही त्या मुळे तालुक्यातील गावे जलयुक्त शिवार योजनेत घेण्यासंदर्भात आपण पुढाकार घेऊन बैठक लावावी अशी विनंती केली यावेळी पंचायत समितीचे सदस्य अजय सकट व माऊली पाटील यांनी तालुक्यातील गांवात पाण्याची टंचाई असुन अधिकारी दुर्लक्ष करित आहे त्यामूळे ही गावे जलयुक्त शिवार योजनेमध्ये खुडूस,उंबरे दहिगाव,म्हाळुंग, तांबवे, कुसमोड, फळवणी, तांदुळवाडी, भांबुर्डी, एकशिव, चाकोरे, शिंदेवाडी, नेवरे, खळवे, तिरवंडी, विझोरी, मेडद, मारकडवाडी, कचरेवाडी, कदमवाडी,या गावांचा समावेश करण्याची मागणी केली तसेच मळोली या गावात जलयुक्त कामे करण्यासाठी मोठ्या प्रमाणात सोर्सही उपलब्ध आहेत. तसेच वन विभागामध्ये ही कामे करण्यास मोठ्या प्रमाणात संधी आहे. त्याचप्रमाणे पानीव या गावाचा जलयुक्त मध्ये गांव घेण्याचा सर्वेही झालेला आहे. ही सर्व गांवे 19-20 मध्ये घेण्यासंदर्भात तसेच 15_16,16_17,17_18 मध्येही झालेल्या गावात राहिलेले कामे करण्यास तयार आदेश मा. जिल्हाधिकारी साहेबांना व मा. विभागीय आयुक्तना द्यावेत अशी मागणी शिष्टमंडळानी राज्यमंत्री सदुभाऊ खोत यांच्याकडे केली आहे.