गोडसे वस्तीची शाळा ही सोलर सिस्टिम असणारी जिल्ह्यातील पहिली शाळा ….!
पिलीव/सुजित सातपुते
जिल्हा परिषद प्राथमिक शाळा गोडसे वस्ती ही शाळा बंद पडण्याच्या स्थितीत असताना शाळेने इतिहास घडविला आहे. गटशिक्षणाधिकारी श्री.देशमुख साहेब, विस्ताराधिकारी नकाते साहेब व केंद्र प्रमुख श्रीमती.जाधव मॅडम यांच्या प्रेरणेने
शाळा व्यवस्थापन समिती व माजी विद्यार्थी , पालक , शिक्षक या सर्वांचे सहकार्याने सोलर सिस्टिम असणारी माळशिरस तालुक्यातच नव्हे तर सोलापूर जिल्ह्यातील पहीली शाळा ठरली आहे ती म्हणजे शिंगोर्णी येथील गोडसे वस्तीची शाळा. दिनांक -०३/१२/२०१८ रोजी शाळेला शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष श्री. रघुनाथ गोडसे यांच्या सहकार्याने शाळा व्यवस्थापन समितीचे ग्रा. प. सदस्य व दूध डेअरी चे चेअमन श्री. औदुंबर काळेल यांनी ६०००रू चा लुमिनस कंपनीचा सोलर सिस्टिमचा इन्व्हटर दिला.शाळेला सोलर सिस्टिम प्लेट बसविण्यासाठी शिंगोर्णी गावचे सुपुत्र डॉ.श्री. संजय उत्तम काळेल यांचेकडून १०,००० रुपये व शाळा व्यवस्थापन समिती गोडसे वस्ती सदस्य श्रीमती.निता राजेंद्र काळेल -१०००रू,श्री.तुळशीराम लक्ष्मण गोडसे -२०००रू ,श्री.बंडू किसन बाड – १०००रू श्री. गौतम गोवर्धन आटपा डकर -१०००रू ,श्री. दादासो आप्पा मुंजे -१०००रू शाळेचे मुख्याध्यापक श्रगावी सर्जेराव शिवाजी शिंदे सर -४०००रू तसेच गोडसे वस्तीचे सुधारीत बागायतदार श्री.रावसाहेब मुंजे यांनी ९६००रू ची १८० Amp ची बॅटरी दिली.
जिल्हा परिषद प्राथमिक शाळा गोडसे वस्ती,शाळा व्यवस्थापन समिती,पालक यांच्यावतीने सर्व देणगीदारांचे शिंदे सरांनी आभार मानले.