पालकमंत्र्यामुळे तालुक्यातील रस्त्यासाठी मुख्यमंत्री सडक योजनेतून 9 कोटी 27 लाखाचा निधी मंजूर – अजय सकट
पिलीव/सुजित सातपुते
माळशिरस तालुक्यातील 5 रस्त्यासाठी मुख्यमंत्री सडक योजनेतून 9 कोटी 27लाख 35 हजार रुपयांचा निधी जिल्ह्याचे पालकमंत्री विजयकुमार देशमुख यांनी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे पालवे यांच्याकडून मंजूर करून दिल्याची माहिती भाजपचे पंचायत समितीचे सदस्य अजय सकट यांनी पत्रकारांशी बोलताना दिली
यावेळी पुढे बोलताना सकट म्हणाले की या राज्याचे कार्यक्षम मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस,प्रदेशाध्यक्ष खा.रावसाहेब दानवे,ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे पालवे ,जिल्ह्याचे पालकमंत्री विजयकुमार देशमुख यांच्या माध्यमातून व प्रेरणेतून तालुक्यातील विकासकामासाठी भरीव निधी आजवर मिळाला आहे अजुनही तालुक्यातील विविध विभागाच्या विकासकामासाठी निधी उपलबध होणार आहे
जिल्ह्याचे नेते उत्तमराव जानकर,भाजपचे तालुकाध्यक्ष सोपान नारनवर, भाजपचे नेते के केे पाटील ,रंजनभाऊ गिरमे,मच्छिंद्र ठवरे,हनुमंतराव सुळ, तुकाराम देशमुख, रणजितसिंह जाधव,गौत्तम माने ,सुभाष गांधी यांच्या मार्गदर्शनाखाली 5 रस्त्यापैकी 2 रस्त्याला निधी मिळाला आहे या कामाचा वेळोवेळी पाठपुरावा केला होता पालकमंत्र्यांनी मुख्यमंत्री सडक योजनेतून रा .मा.125 (पंचवटी) -पांढरेमळा जगतापवस्ती 1.35 किमी कामासाठी 109.68 लाख,
रामा 147 (खंडाळी) -राऊतगट 1.80 किमी कामासाठी 147.55 लाख निधी उपलब्ध झाला आहे तर तालुक्यातील ईतर 3 रस्त्यांनासुध्दा हा निधी उपलबध करुन दिला आहे विकासाकामासाठी कर्तव्यदक्ष पालकमंत्री विजयकुमार देशमुख हे सतत प्रयत्न करीत आहेत अजून त्यांच्याकडे सुचविलेली कामे लवकरच मंजूर होतील तसेच माळशिरस तालुक्याचे विविध प्रश्नही उत्तमराव जानकर व के के पाटील यांच्या माध्यमातून सोडविले जातिल तसेच इतर कामासाठीही निधी उपलब्ध होणार असल्याचे सदस्य अजय सकट यांनी सांगितले यावेळी बाळासाहेब वावरे,ड्रा तुकाराम ठवरे ,बाळासाहेब सरगर,संजय देशमुख ,अमोल मेथा,विनोद थिटे,उपस्थित होते