नाभिक समाजाच्या निषेध मोर्चास भारिपचा पाठिंबा…!
पिलीव/सुजित सातपुते
नाभिक समाज बांधव माळशिरस तालुका यांच्या वतीने करपेवाडी ता.पाटण जि. सातारा येथील कु.भाग्यश्री संतोष माने हिची निर्घृण हत्या करणाऱ्या आरोपींना अटक करून, कठोर शिक्षा करण्यात यावी, या मागणीसाठी माळशिरस तहसील कार्यालयावर निषेध मोर्चा काढण्यात आला.यावेळी भारिप बहुजन महासंघ माळशिरस तालुका यांच्या वतीने जाहीर_पाठिंबा देऊन निषेध व्यक्त करताना भरीपचे नेते भैय्यासाहेब बाबर,भरीपचे तालुका महासचिव विजयभाऊ बनसोडे,युवा महासचिव रणजित सरवदे, माळशिरस शहर अध्यक्ष भारिप आयु. अजय धाइंजे,तालुका संघटक प्रमोद धाइंजे व नाभिक समाज संघटनेचे राहुल सराटे ,किरन भांगे ,योगेश जाधव ,विठ्ठल जाधव ,सोमनाथ सपकाळ इत्यादी उपस्थित होते.