नॅशनल दलित मूव्हमेंट फॉर जस्टीसचे भव्य राज्य स्तरीय महाअधिवेशन व पुरस्कार सोहळा – २०१९ थाटात संपन्न…

पिलीव/सुजित सातपुते
दिनांक ३० जानेवारी २०१९ रोजी वाशिम येथे नॅशनल दलित मूव्हमेंट फॉर जस्टीस (एन.डी.एम.जे.) चे “ भव्य राज्य स्तरीय महाअधिवेशन व पुरस्कार सोहळा – २०१९ अनेक मान्यवरांच्या उपस्थितीत पार पडला.

नॅशनल दलित मूव्हमेंट फॉर जस्टीस (एन.डी.एम.जे.) च्या माध्यमातून महाराष्ट्रात मागील २० वर्षा पासून एट्रोसिटी कायदा आणि अनुसूचित जाती-जमातींच्या अधिकारावर विविध उपक्रम, लॉंगमार्च, कार्यशाळा, परिषदा इत्यादी चे आयोजन करण्यात आले आहे. याचाच एक भाग म्हणून जुने जिल्हा परिषद मैदान-वाशिम येथे ३० जानेवारी २०१९ रोजी “राज्य स्तरीय महाअधिवेषण” आयोजित करण्यात आले होते. या महामेळाव्यात संपूर्ण देशातून सामाजिक, राजकीय, प्रशासकीय, शैक्षणिक, न्यायालईन, उद्योजकता, कला, पत्रकारिता व इतर क्षेत्रातील दिग्गज पुढारी व माण्यवर यांना त्यांनी केलेले उल्लेखनीय कार्याकरीता विविध पुरस्कार देवून सन्मानित करण्यात आले.

या अधिवेशानाचे उद्घाटन महाराष्ट्र राज्याचे अनुसूचित जाती-जमती आयोगाचे सदस्य मा.सी.एल.थूल यांनी थोर पुरुषांच्या प्रतिमान्ना पुष्पहार अर्पण करून केले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थान एन.डी.एम.जे. चे राष्ट्रिय महासचिव मा.डॉ.रमेश नाथन आणि स्वागताध्यक्ष राज्य महासचिव एड.डॉ.केवल उके यांनी भूषविले.

यावेळी प्रमुख मार्गदर्शक व पाहुने म्हणून माजी समाज कल्याण आयुक्त मा.आर.के.गायकवाड, वरिष्ठ कायदे तज्ञ एड.बी.जी.बनसोडे, माजी अतिरिक्त जिल्हाधिकारी मा.यशवंत गायकवाड, वरिष्ठ सामाजिक नेते मा.ललित बाबर, एन.डी.एम.जे. चे केंद्रीय समन्वयक मा.अबिरामी ज्योतीस्वरण, उद्योजक विनोद जाधव, कामगार नेते सागर तायडे, रेल्वे कर्मचारी नेते हेमंत जाधव, सामाजिक युवानेते एड.प्रियदर्शी तेलंग, मा. रमेश कटके, मा.किरण वाघेला, मा.शुद्धोधन सहारे, मा.सुरेश भोईर व अनेक मान्यवरान्नी उपस्थित हजारो कर्यर्त्यान्ना मार्गदर्शन केले.

या अधिवेशनात आंतरराष्ट्रीय मानवाधिकार दिवस आणि मानवाधिकाराचे वैश्विक घोषणा पत्राच्या ७० वर्षांनंतर आणि जाती आधारित भेदभाव, अस्पृश्यता आणि हिंसा यावर मागील २० वर्षाच्या अनुभावाच्या आधारावर २०१९ च्या संसदीय निवडणुकीसाठी राष्ट्रीय दलित मानवाधिकार अभियान व नॅशनल दलित मूव्हमेंट फॉर जस्टीस या संघटनेने ‘दलित जाहीरनामा’ जाहीर केला.

तज्ञांनी दिलेल्या माहितीच्या आधारावर सदर घोषणापत्र हे एस.सी. आणि एस.टी.चे न्यायोचित व संविधानिक हक्क यांच्या वास्तविक अनुभावरून बनविण्यात आले. या मध्ये एकीकडे दलितांचा न्याय मिळवण्याच्या हक्क, दलित महिलांचे न्यायिक हक्क, मुलांचे व युवकांचे हक्क, मानवी हक्कांचे रक्षण करणारे सामाजिक कार्यकर्त्यांचे हक्क आणि अल्पसंख्यकांचे हक्क इत्यादी तर दुसर्या बाजूवर आर्थिक अधिकार, गुणवत्तापूर्ण शैक्षणिक अधिकार, जमीन हक्क संरक्षण, रोजगार संधी, खाजगी आणि उद्योजक क्षेत्रांमध्ये आरक्षण, आरोग्य योजनांचे मानके, पुरेसे अन्न, पाणी, स्वच्छता, कपडे, गृहनिर्माण आणि आपत्ती प्रतिसाद इत्यादींचा समावेश करण्यात आला आहे. घोषणापत्रा मध्ये देशाचे लोकशाही आणि प्रशासन व त्या मध्ये दलित आणि आदिवासी समुदायांच्या सहभागास वाढविण्यासाठी आवश्यक असलेल्या अनेक गरजा यांचा समावेश करण्यात आला आहे. हे सर्व पैलू दलित घोषणापत्रातील १२ अध्यायात विस्तृतरीत्या मांडून या घोशनापत्रातील सर्व मागण्या येणाऱ्या निवडणुकीत प्रत्येक राजकीय पक्षांनी आपल्या निवडनुक घोषणापत्रात समाविष्ट कराव्यात असा ठराव या अधिवेशनात सर्वानुमते पास करण्यात आला.

संपूर्ण आयुष्य समाज कार्यास अर्पण करणारे न्यायमूर्ती सी.एल.थूल, मा.आर.के.गायकवाड, एड.बी.जी.बनसोडे आणि मा.ललित बाबर यांचा क्रांतीसुर्य ज्योतिबा फुले आणि क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले “ज्योती-सावित्री जीवन गौरव पुरस्कार” देवून सन्मान करण्यात आला.

यावेळी माजी. अतिरिक्त जिल्हाधिकारी मा.यशवंत गायकवाड, कामगार नेते मा.सागर तायडे, ऑल इंडिया एस.सी.एस.टी.रेल्वे एम्प्लॉइज अशोसिएसन चे विभागीय कार्याध्यक्ष मा. हेमंत जाधव यांना राष्ट्रनिर्माते डॉ.बाबासाहेब आंबेडकर समाज भूषण पुरस्कार देवून गौरविण्यात आले.

अतिशय हलाखिच्या परिस्थितीतून संघर्ष करून उद्योग जगतात गरुड़ भरारी घेतलेल्या पद्मश्री कल्पना सरोज (अंतरराष्ट्रीय उद्योजक तथा संचालक, कमानी टयूब्स) आणि मा.विनोद जाधव (बांधकाम व्यवसाईक तथा संचालक लैपविंग ग्रुप, मुंबई) यांचा “उद्योग भूषण पुरस्कार” देवून सन्मान करण्यात आले.

अभिनेते मा.भीमसेन चव्हाण, शाहिर बबन मोरे, नामदेव दिपके, सुभाष साळवे, जनार्दन भालेराव,सुशिला घुगे व अनेक शाहीरांना “लोकशाहिर वामनदादा कार्डक कलागौरव पुरस्कार” तसेच देशातील नामवंत शेती-संशोधक मा.अनिरुद्ध पुनवटकर यांना ऐ.पी.जे.अब्दुल कलाम “उत्कृष्ठ संशोधन पुरस्कार” देवून गौरविण्यात आले.

या महाधिवेशनात आपल्या तल्लख बुद्धीने न्यायालयईन लढाई फतेह करणारे अनेक विधिज्ञ यांना कायदेपंडित डॉ.बाबासाहेब आंबेडकर विधिसेवा पुरस्कार देवून गौरविन्यात आले. यामध्ये प्रामुख्याने एड.प्रज्ञेश सोनवने( ठाणे) एड.दिलीप निकाळजे (उस्मानाबाद), एड.आनंद खंडेराव (कल्याण), एड.विशाल साळवे (धुळे), एड.प्रवर्जा महाजन(अमरावती) एड.किशोर सरदार (बुलढाना) व इतर अधिवाक्त्यांचा विशेष सन्मान करण्यात आला.

सामजिक कार्यात पुरुषांना सुद्धा लाजवातिल असे कार्य करून बौद्ध, दलित-आदिवासी व वंचित स्त्रियांचे मानवी हक्क सरंक्षित व संवर्धित करनाऱ्या सामाजिक नेत्या व कार्यकर्त्यान्ना “राजमाता जिजाऊ रणरागिनी पुरस्कार” देवून सन्मानित करण्यात आले. यामध्ये मा.रमाताई अहिरे, मा.दिक्षा जगताप, मा. पंचशीला कुंभारकर, मा.सत्यभामा सौंदरमल, मा.वंदनाताई सहारे, मा.रंजना गायकवाड, मा.शोभा जाधव, मा.रुपाली मोरे, मा.वंदनाताई बागडे यांच्या सह अनेक महिला नेत्यांचा सहभाग होता.

या व्यतिरिक्त डॉ.रामकृष्ण कालापाड, आयु.मधुकर जुमडे, आयु.दौलतराव हिवाळे, प्रा.सुभाष अंभोरे, डॉ.एम्.बी.डाखोरे, आयु.निलेश भोजने, प्रा.हरिदास बनसोडे यांना राजश्री शाहू महाराज पुरस्कार प्रदान करण्यात आला. तसेच जेष्ठ साहित्तिक मा.तात्यासाहेब सोनवने यांना साहित्य सम्राट अन्नाभाऊ साठे साहित्यरत्न पुरस्कार देवून गौरविण्यात आले.

विशेष म्हणजे डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पत्रकारितेचा आदर्श समोर ठेवून जे सामाजिक पत्रकारिता करून प्रसारमाध्यमांत समाजहित जोपसनाऱ्या पत्रकार व संपादक यांना उत्कृष्ट पत्रकारिता पुरस्कार देवून त्यांचा यथोचित सन्मान करण्यात आला. या मध्ये मा.रविन्द्र थोरात (दैनिक विश्वपथ व प्रहार), मा.कमलाकर जगताप (सहयाद्री वाहिनी), मा.संजय भालेराव (दै.कोंकण सकाळ), मा.संजयकुमार खैरे (लार्ड बुद्धा टीवी तथा आवाज इंडिया), मा.प्रमोद शिंदे (दै.मानदेश एक्सप्रेस), मा.वैभव काटे (दै.एकमत व तरुण भारत), मा संजय मकेगावकर
पत्रकार-लातूर), आयु.मिलिंद वानखडे (दै.लोकनायक), आयु.गौतम भंडारे (पाक्षिक बंडखोर), आयु.संदीप पिंपळकर (दै.जनमाध्यम), श्रीकांत बाविस्कर (दै.लोकमत), आयु.सुनील पाटिल(दै.पुन्यनगरी), आयु.दीपक प्रेक्षाळे (दै.मानदेश एक्सप्रेस), आयु.विलास भोसले (दै.तरुण भारत), आयु.पप्पू घुगे (दै.लोकशाही वार्ता), मा.सुजीत सातपुते (दै.पंढरिभुशन), मा.राम चौधरी (दै.सकाळ) यांच्या सह अनेक पत्रकारांचा लक्षणिक सहभाग होता.

या सर्व पुरस्कार सोहळ्यात तळागळातिल वास्तविक समाजकार्याच्या पुरस्काराचे खरे मानकरी आणि नॅशनल दलित मूव्हमेंट फॉर जस्टीस चे आधारभूत कार्यकर्ते, पदाधिकारी आणि समर्थक यांना त्यांच्या कार्यास “राष्ट्रसंत गाडगेबाबा आणि राष्ट्रसंत तुकडोजी महाराज समाजगौरव पुरस्कार” देवून गौरविण्यात आले. यात प्रामुख्याने मा.वैभव गीते, मा.शिवराम कांबळे, मा.अंपल खरात, मा.महेंद्र (अन्ना) पंडित,चर्मकार समाजाचे नेते आजिनाथ राऊत,मा. शरद शेळके, मा.बी.पी.लांडगे, मा.बोधिसत्व माने, मा.दादा जाधव, मा.जगदीप दिपके, मा.विलास ढगे, मा.भारत गवई, मा. विष्णु वाघ, मा.दिलीप अदमने, मा. प्रशांत जाधव, मा.शशिकांत खंडागळे, मा.संजय झेंडे, मा.रविन्द्र झेंडे, मा.बाबासाहेब सोनावने, मा.अनिरुद्ध गायकवाड, मा.धनाजी शिवपालक, मा. संजय नवगिरे, मा. बंदिश सोनावने, मा.अमित साळवे, मा.शशिकांत वाघ, मा.विनोद रोकडे, मा.समाधान सावंत, मा.दत्ताराव वानखड़े, मा.संजय सोनावने, मा.धनाजी गायकवाड, मा.सचिन दिपके, मा.दलित दिपके, मा.अब्दुल हाफिज, मा.प्रशांत झीने यांच्या सह अनेक कार्यकर्त्यांचा समावेश होता.

रेकॉर्डब्रेक गर्दी करत अधिवेशानाला जवळपास तीन हजाराच्या वर आंबेडकरी जनसमुदायाने हजेरी लावली. कार्यक्रमाचे मुख्य निमंत्रक मा.पी.एस. खंडारे आणि त्यांच्या स्थानिक सहकारयांनी अधिवेशानाचे अतिशय उत्कृष्ट असे नियोजनबद्ध आयोजन केले होते. सभागृहाला शहीद सागर शेजवळ तसेच विचार मंचाला शहीद चंद्रकांत गायकवाड व शहीद मानिक उदागे असे नाव देवून पी.एस. खंडारे यांनी अधिवेशनाचा नवा पायंडा घातला. पुरस्कार सोहळ्याचे संचलन आयु.वैभव गीते आयु.बी.पी.लांडगे,आयु.बोधिसत्व माने यांनी केले तर आभार प्रदर्शन आयु.प्रमोद शिंदे यानी करत कार्यक्रमाची व्यवस्थित सांगता केली.

यावेळी उपस्थित पाहुने तथा जनासमुदायाने नॅशनल दलित मूव्हमेंट फॉर जस्टीस च्या मागील विस वर्षाच्या कार्याची भरभरून स्तूती करून सर्व सामाजिक कार्यकर्त्यांचे मनोबल वाढविले व डॉ.बाबासाहेबान्ना अपेक्षित कार्य संघटना करत असल्याचे अनेक उपस्थितांकडून सांगण्यात आले.

डॉ.केवल उके
राज्य महासचिव
एन.डी.एम.जे. महाराष्ट्र
9325592939

आयु.पी.एस.खंडारे
राज्य सहसचिव
एन.डी.एम.जे.महाराष्ट्र
8007468150

आयु. प्रमोद शिंदे
राज्य प्रसिद्धी प्रमुख
एन.डी.एम.जे.महाराष्ट्र
9975903040

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *