दुष्काळ व्यवस्थापन सहींता २०१६ मराठीत उपलब्ध करा—किरण साठे

प्रतिनिधी—अकलूज—केंद्र सरकारने तयार केलेली दुष्काळ व्यवस्थापन संहिता २०१६ ही इंग्रजी मध्ये उपलब्ध आहे,ती मराठी भाषेमध्ये उपलब्ध करावी या मागणीसाठी मनसे जिल्हाउपाध्यक्ष किरण साठे यांनी अकलूज उपविभागीय अधिकारी माळशिरस विभाग अकलूज यांना निवेदन दिले,महाराष्ट्र राज्यामध्ये ज्या तालुक्यामध्ये दुष्काळ जाहीर करण्यात आला आहे, त्या तालुक्यात सरकारने काय उपाययोजना केल्या पाहिजेत आणि दुष्काळग्रस्त तालुक्यातील जनतेला काय अधिकार आहेत,याबाबत केंद्र सरकारने एक आचारसंहिता तयार केली आहे,साधारणपणे लोकांना या आचारसंहितेने कोणते अधिकार दिले आहेत हेच सरकार लोकांना सांगताना दिसत नाही,त्यांचे अधिकार लोकांना समजावे व इंग्रजी मध्ये असलेली दुष्काळ व्यवस्थापन संहिता मराठीत भाषांतर करावी,तसेच महाराष्ट्र राज्यामध्ये मराठी भाषिक राहतात त्यामुळे दुष्काळ व्यवस्थापन संहिता २०१६ याची माहिती मराठी भाषेमध्ये सार्वजनिक करून ती माळशिरस तालुक्यातील प्रत्येक ग्रामपंचायत कार्यालायमध्ये,प्रत्येक तलाठी कार्यालयामध्ये पंचायत समिती माळशिरस या कार्यालयामध्ये,तहसील कार्यालयात तसेच उपविभागीय अधिकारी माळशिरस विभाग अकलूज या कार्यालयामध्ये मराठी भाषेमध्ये उपलब्ध करून त्याचे फलक वरील सर्व कार्यालयामध्ये त्वरित लावण्यात यावे अन्यथा मनसेच्या वतीने तीव्र स्वरूपात आंदोलन छेडले जाईल असा इशारा मनसे जिल्हाउपाध्यक्ष किरण साठे यांनी उपविभागीय अधिकारी यांना दिलेल्या निवेदनात दिला आहे,यावेळी मनसे तालुकाध्यक्ष बापू वाघमारे,महिला सेनेच्या रुक्मिणी रणदिवे,मनसे अकलूज शहराध्यक्ष सुदाम आवारे,जनसेवा संघटनेचे मागासवर्गीय सेलचे तालुकाध्यक्ष रघुनाथ साठे,मनसे उपाध्यक्ष बंडू कांबळे,राजू बागवान, विकी केसकर,बहुजन ब्रिगेड अकलूज शहराध्यक्ष आनंद मिसाळ,इत्यादि उपस्थित होते

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *