अखेर आंबेडकरी चळवळीचाच विजय….!
पिलीव/सुजित सातपुते
दलित अत्याचाराने संपूर्ण महाराष्ट्र ढवळून निघाला होता.अशी अहमदनगर जिल्ह्यातील दोन प्रकरने असून शहीद नितिन आगे(खरडा),शहीद सागर शेजवळ (शिर्डी) यांच्या कुटुंबातील दुर्गा आगे व आकाश शेजवळ यांना अहमदनगर समाजकल्याण अधिकारी यांनी शासकीय नौकरित सामावुन घेतले आहे.चार वर्षांपासून नॅशनल दलित मुव्हमेंट फ़ॉर जस्टिस (एन.डी.एम.जे) महाराष्ट्र संघटनेच्या कार्यकर्त्यांनी चैत्यभूमी दादर येथे 6 डिसेम्बर व भीमाकोरेगाव येथे 1 जानेवारी तसेच 25 डिसेम्बर रोजी देहुरोड पुणे येथे पोस्टकार्ड अभियानात लाखो पोस्टकार्ड लिहून शासनाचे लक्ष वेधले मंत्रालय स्तरावर मंत्रीमहोदयांना बैठकी घेण्यास भाग पाडले जिल्हा तालुक्यावर धरणे,मोर्चे,आंदोलने करुण खड़तर पाठपुरावा केला नॅशनल दलित मुव्हमेंट फ़ॉर जस्टिस (ndmj) या सामाजिक संघटनेचे महासचिव adv.dr.केवलजी ऊके साहेबांनी सर्व कायदेशीर बाबींची पूर्तता केली आणि राष्ट्रीय अनुसूचित जाती आयोग दिल्ली यांना निवेदन दिले आयोगाने मुख्य सचिव महाराष्ट्र राज्य यांना नोटिस काढले 25 जानेवारी 2019 रोजी आयुक्त समाजकल्याण पुणे यांच्या कार्यालासमोर पीडित कुटुंबांना घेऊन आमरण उपोषण केले या आंदोलनात सर्व पदाधिकारी,सदस्य यांनी मोलाची साथ दिली.महाराष्ट्रातील आंबेडकरी जनतेने आंदोलनास भरभरुन साथ दिली तसेच सोशल मिडियावर दिलेल्या अहवानास कार्यकर्त्यांनी पोस्ट शेअर करुण सरकारवर दबाव आणला आणि अखेर विजय भारतीय संविधानाचा झाला.व पिडीत कुटुंबातील सदस्याला शासकीय नौकरी मिळाली.
चौकट:- महाराष्ट्रातील सर्व जातीय अत्याचारात खून झालेल्या पीडत कुटुंबांचे शासकीय नोकरी,जमीन,पेंशन देऊन पुनर्वसन झाल्याशिवाय संघटना शांत बसणार नाही.
जय भिम,जय ज्योति,जय शिवराय
वैभव गिते
राज्य सचिव
नॅशनल दलित मुव्हमेंट फ़ॉर जस्टिस
8530945857