कु.अपेक्षा मानकुंबरे हिचा पालकमंत्र्यांच्या हस्ते सन्मान…!

पिलीव/सुजित सातपुते
लोकशाही पंधरावडा निमित्त जिल्हाधिकारी सातारा यांनी आयोजित केलेल्या विविध स्पर्धेत यशवंतराव चव्हाण महाविद्यालय पाचवड ता.वाई जि.सातारा या आमच्या महाविद्यालयाच्या कु.अपेक्षा बाजीराव मानकुंबरे या विद्यार्थिनीने तीन स्पर्धेत उज्ज्वल यश संपादन केले आहे,

1)सातारा जिल्हास्तरीय आंतरमहाविद्यालयीन रांगोळी स्पर्धेत प्रथम क्रमांक

2)सातारा जिल्हास्तरीय आंतरमहाविद्यालयीन भित्तीपत्रक स्पर्धेत द्वितीय क्रमांक
3)सातारा जिल्हास्तरीय आंतरमहाविद्यालयीन लोगो स्पर्धेत द्वितीय क्रमांक
तिच्या या यशाबद्दल महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ राजीव बावधनकर यांनी तिचे अभिनंदन केले

आज 26जानेवारी 2019 रोजी सातारा जिल्हा पालकमंत्री मा. विजय शिवदारे यांचे हस्ते तिला प्रमाणपत्र देऊन गौरव करण्यात आला, यशवंतराव चव्हाण महाविद्यालय पाचवड चे सांस्कृतिक विभाग प्रमुख प्रा.सुभाष वाघमारे,प्रा.डी एस भाडळकर, प्रा तृप्ती नाईक यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले असल्याचे अपेक्षाने पत्रकारांशी बोलताना सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *