वैष्णवीने झळकविले राष्ट्रीय नेमबाजी क्रमवारीच्या गुणवत्ता यादीत पिलीव गावचे नाव…!
पिलीव/प्रतिनिधी
त्रिवेंद्रम (केरळ) येथे नुकत्याच 25 जानेवारी ते 8 फेब्रुवारी या कालावधीत झालेल्या 1 व 2 भारतीय 10 मी.एअर पिस्तल प्रकारात माळशिरस तालुक्यातील पिलीव येथील कु.वैष्णवी अनिल खटावकर हिने उत्तुंग यश संपादन केले आहे.महाराष्ट्र राज्याच्या संघाचे प्रतिनिधीत्व करताना 600 पैकी 553 व 600 पैकी 552 गुण मिळवून पहिल्याच प्रयत्नात भारतीय संघ निवड प्रक्रियेत राष्ट्रीय/आंतरराष्ट्रीय खेळाडूंना मागे टाकून राष्ट्रीय नेमबाजी क्रमवारीत 370 खेळाडूमधून वैष्णवीने सर्वोत्तम 50 खेळाडूंच्या यादीत 32 वे स्थान मिळवून पिलीव गावचे नाव गुणवत्ता यादीत झळकविले आहे.अगदी लहान वयात पहिल्याच प्रयत्नात हे यश मिळवणारी वैष्णवी पहीलीच खेळाडू ठरली आहे.आणि येत्या कालावधीत या कामगिरीत आणखी सुधारणा करून लवकरच भारतीय संघातही स्थान मिळवून पिलीव गावचे नाव जागतिक पातळीवर चमकवण्यासाठी मी प्रयत्नशील राहणार असल्याचे वैष्णवीने माळशिरस टाईम्सशी बोलताना सांगितले.वैष्णवी ही राष्ट्रीय प्रशिक्षक आकाश गुजरे सर यांच्या मार्गदर्शनाखाली नेमबाजी प्रशिक्षण घेत असून ती पिलीव येथील कर्मवीर भाऊराव पाटील विद्यालयात शिक्षण घेत आहे.तिच्या या यशाबद्दबल जिल्हास्तरावर कौतुक होत असून माळशिरस तालुक्याचे आमदार राम सातपुते,स्वरूपाराणी मोहिते-पाटील, जि.क्रीडाअधिकारी नितीन तारळकर,माजी सभापती संग्रामसिंह जहागीरदार,जि.प.सदस्य गणेश पाटील, सरपंच नितीन मोहिते, मुख्याध्यापक लेंडवे सर, शिवराज पुकाळे, समस्त ग्रामस्थ व पिलीव पत्रकार संघ यांनी वैष्णवीचे अभिनंदन व कौतुक करुन पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
फोटोत जागतिक सुवर्ण पदक विजेते जितु रॉय व वैष्णवी खटावकर दिसत आहे.