पिलीव येथील रुद्र सुहास कोल्हे ॲबॕकस स्पर्धेत देशात प्रथम
पिलीव/प्रतिनिधी
पिलीव येथील सिमत ॲबॕकस प्रोॲकटीव्ह ॲकॕडमीचा रुद्र सुहास कोल्हे हा पुणे येथे झालेल्या राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धेत देशात प्रथम आला. या स्पर्धेत महाराष्ट्र, गुजरात, मध्य प्रदेश, गोवा, कर्नाटक या राज्यातील एकुण 1300 विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. यामध्ये स्सिमथ प्रोॲकटीव्ह ॲबॕकस पिलीव येथील रुद्र सुहास कोल्हे या देशात प्रथम आला. यामध्ये पिलीव येथील 14 विद्यार्थी सहभागी झाले होते. त्याची सिंगापूर येथे होणाऱ्या आंतरराष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे. तो पिलीव येथील जि प शाळेमध्ये दुसरीमध्ये शिकत आहे. त्याचे वडील कुसमोड येथील जि प लक्ष्मी नगर शाळेत मुख्याध्यापक आहेत तर आई शिक्षीका आहे. त्याला अतिश फाळके सर ,सय्यद सर,जाधव सर यांचे मार्गदर्शन लाभले. त्याच्या हया यशाबद्दल माळशिरस पं स.गटशिक्षणाधिकारी देशमुख साहेब, शिक्षण विस्तार अधिकारी नकाते साहेब, पिलीव चे केद्रप्रमुख फासे, लक्ष्मी नगर शाळा व्यवस्था पन समीती यांच्या कडून अभिनंदन व कौतुक होत आहे.