राष्ट्रीय कुस्ती स्पर्धेत गणेश कर्णवरला कास्य पदक…!


पिलीव/सुजित सातपुते
राजेवाडी येथील सदगुरु श्री श्री साखर कारखान्याचे व्हाईस चेअरमन बाळासाहेब कर्णवर यांचे चि . गणेश कर्णवर यांनी राष्ट्रीय कुस्ती स्पर्धेत कास्यपदक मिळविले .
दिल्ली येथे भारत सरकारच्या क्रिडा मंत्रालयाच्या वतीने राष्ट्रीय कुस्ती स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते . महाराष्ट्र संघातून पुण्याच्या काकासाहेब पवार तालमीतील मल्ल गणेश कर्णवर यांची निवड करण्यात आली होती .
गणेश कर्णवर यांची सलामीच्या कुस्तीत उत्तर प्रदेशच्या मल्लाला हरवून उपांत्यफेरीत प्रवेश केला . उपांत्य फेरीत त्यांनी गुजरातच्या मल्लाला अस्मान दाखविले . यावेळी त्यांना दुखापत झाल्याने अंतीम सामन्यात त्यांची लढत न झाल्याने त्यांना तिसऱ्या क्रमांकासाठी हरियाणाच्या मल्ला बरोबर लढत द्यावी लागली . या सामन्यात त्यांनी हरियाणाच्या मल्लाला ५-९ अशा गुणांनी पराभूत करीत कास्य पदक पटकाविले .
त्यांच्या यशाबद्दल सदगुरु श्री श्री साखर कारखान्याचे चेअरमन एन . शेषागिरीराव यांनी अभिनंदन केले आहे .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *