पिलीव परिसरामध्ये लावले ग्रामीण पोलिस दलातील टोल फ्री क्रमांकाचे फलक…!

पिलीव/सुजित सातपुते

प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून पिलीव गावचे नूतन सरपंच नितीन विठ्ठल मोहीते(माळी),किरण मल्लिकार्जुन आर्वे व एस.एन क्लासेसचे भैस सर यांच्या सौजन्याने माळशिरस तालुक्यातील पिलीव परिसरातील कर्मवीर भाऊराव पाटील व रमेश खलिपे ज्युनि.कॉलेज पिलीव,जवाहरलाल शेतकी विद्यालय पिलीव व श्री विठ्ठल दयाजी विद्यालय सुळेवाडी या ठिकाणी सोलापूर ग्रामीण पोलिस दलातील मदत केंद्राचे संपर्क क्रमांक दर्शविणारे फलक लावण्यात आले.लहान मुलांच्या मदतीसाठी 1098, महिलांच्या मदतीसाठी 1091, कंट्रोल रुम 0217-2732000, व्हाट्स अप.नं 7264885901,2 तर माळशिरस पोलीस स्टेशन 02185-245033 अशा पध्दतीचे फलक लावण्यात आले असून सदरच्या फलकांचे उद्धघाटन पिलीव गावचे नूतन सरपंच नितीन मोहीते,पोलिस उपनिरीक्षक प्रमोद सुर्वे,किरण आर्वे व शालेय विद्यार्थीनी यांच्या हस्ते करण्यात आले.एखाद्या विद्यार्थीनीची किंवा महिलेची छेडछाड,पाठलाग होत असेल किंवा कोणी त्रास देत असेल तर वरील टोल फ्री क्रमांकावरती कोणीही संपर्क करुन तक्रार करु शकते किंवा मदत मागू शकते त्यास तात्काळ मदत मिळेल.असे पोलिस उपनिरीक्षक प्रमोद सुर्वे यांनी सांगितले.यावेळी शिवसेना शहराध्यक्ष विक्रम भैस यांनीही पिलीव-पंढरपूर रोडवरती स्वखर्चाने चार फलक लावणार असल्याचे सांगितले.सदर कार्यक्रमाप्रसंगी पत्रकार प्रमोद भैस,अभिजीत तावरे,तनवीर पठाण,जुबेर पठाण,मोहसिन शेख,तुषार जाधव पिलीव औट पोस्टचे मोहळकर,गायकवाड,जगताप,धुमाळ,गावडे यांसह परिसरातील विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *