सोलापुर जिल्हाधिकारी कार्यालयावर २६ जानेवारीला अपंगांचे तीव्र आंदोलन- विजयकाका कुलकर्णी….!
अकलुज/प्रतिनीधी
दिव्यांगांचे दैवत आ.बच्चु कडु,रामदास खोत,धर्मेंद्र सातव व अतुल खुपसे,अजित कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली अपंगांना आॅनलाईन प्रमाणपत्र मिळण्यासाठी प्रहार दिव्यांग क्रांती आंदोलन व दिव्यांग क्रांती संघटनेच्या वतीने येत्या २६ जानेवारी रोजी ८००ते १०००अपंगांना सोबत घेउन भव्य असे तीव्र आंदोलन सोलापुर जिल्हाधिकारी कार्यालयावर काढणार आसल्याचे संघटनेचे विजयकाका कुलकर्णी यांनी अकलूज येथील शासकीय विश्रामगृहात पत्रकारांशी बोलताना सांगितले.
अपंग बांधवांवर होणारा अन्याय तसेच अकलुज येथील उपजिल्हा रूग्णालयात अपंगाचे आॅलाईन प्रमाणपत्र मिळण्यासाठी लवकरात लवकरत चालु करण्यासाठी योग्य कार्यवाही व्हावी व चालु व्हावे तसेच माळशिरस पंचायत समितीचे गटविकास अधिकारी अमोल ताकभाते हे अपंगाची हेळसांड करून अपंगांना दुय्यम वागणुक देत असुन त्यांची मग्रुरी त्वरीत थांबवावी अपंगाचा ५% निधी २०१४ ते आजपर्यंत निधीचे रोखस्वरूपात वाटप व्हावे अपंगांना विना अट घरकुल द्यावे ५०% घरपट्टी सवलत देण्यात यावी आदी मागण्यांसाठी सोलापुर जिल्हा कलेक्टर आॅफीसवर तीव्र आंदोलन करणार असल्याचे अपंगाचे माळशिरस तालुक्याचे खंबीर नेतृत्व विजयकाका कुलकर्णी यांनी सांगितले यावेळी माळशिरस तालुका उपाध्यक्ष सोमनाथ भोसले संघटक आदम तांबोळी अकलुज शहर अध्यक्ष प्रदिप खंडागळे माळीनगर शहर अध्यक्ष भागवत सातपुते राहुल माने मौला सय्यद उत्तम भोसले पुनम काटे आदी अपंग बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.