माझ्या मुलीची आत्महत्या नाही तर हत्याच – दादा सरतापे

विवाहतेच्या वडीलांचा सासरच्या लोकांवर आरोप


माळशिरस/प्रतिनिधी
माळशिरस तालुक्यातील मांडवे (सदाशिवनगर) येथील नेताजी अर्जुन धाईंजे यांची पत्नी मोनिका हिने रविवार दिनांक 29 डिसेंबर रोजी सासरच्या लोकांच्या त्रासाला कंटाळून गळफास घेवून आत्महत्या केल्याचे बोलले जात आसले तरी मोनिकाचे वडील दादा वामन सरतापे रा.चांदापुरी ता.माळशिरस यांनी मात्र माझ्या मुलीने आत्महत्या केली नसून तिची सासरच्याच लोकांनी हत्या केली असल्याचे सा.माळशिरस टाईम्सशी बोलताना सांगितले.सदर प्रकरणाची सविस्तर माहीती अशी कि मोनिका हिचा नेताजी धाईंजे यांच्याशी 3/ 8/ 2012 रोजी विवाह झालेला होता.सध्या मोनिकाला दोन मुली झालेल्या असतानासुध्दा मोनिकाला वडीलांकडून पैसे घेवून ये म्हणून सासरच्या लोकांकडून वारंवार शारीरिक व मानसिक त्रास होत होता. त्याबद्दल मोनिका नेहमी आपल्या माहेरी आई-वडिलांना वेळोवेळी सांगत होती. त्यामुळे दादा सरतापे हे वेळोवेळी मांडवे येथे येऊन सामंजस्य पणाने समजुतीने एकमेकांचा सलोका राखण्याचे काम करीत होते.कधी-कधी दादा सरतापे यांचे मेव्हणे उमेश कांबळे रा.खुडूस व जावई सुजित सातपुते रा.पिलीव यांनीही समजोता घालण्याचा प्रयत्न केलेला होता. परंतु मोनिकाची ननंद गौरी नितीन सरतापे रा.चांदापुरी हिचा पती बाहेरगावी कामास असल्याने सासरी जास्त दिवस न राहता माहेरी जास्त दिवस राहत असल्याने गौरी सरतापे यांचाही जास्त त्रास होत असल्याचे वेळोवेळी मोनिका हिने आपल्या आई-वडिलांना सांगितलेले होते.दिवसांमागून दिवस जात होते मोनिका हीस वेळोवेळी तुझ्या घरच्यांकडून पैसे घेवून ये आमच्यावर कर्ज झालेले आहे असे वेळोवेळी तिला तगादा लावून जाचहाट करून मानसिक व शारीरिक त्रास देण्याचे काम चालू होते. आम्ही मोनिका यांची समजूत काढून आज पर्यंत समजून घेऊन आज ना उद्या मार्ग निघेल या आशेने राहत होतो.परंतु विपरीतच घडले 29 /12/ 2019 रोजी आम्हाला मोनिकाच्या सासरकडून अचानक बोलावणे आले कि आपण ताबडतोब या म्हणून आम्ही अर्ध्या रात्री गेलो त्यावेळेस मोनिका अंगावर ब्लँकेट टाकून झोपलेल्या स्थितीमध्ये पाहिल्यानंतर आम्हाला काय करावे सुचलेले नाही कारण मोनिका ही मृत अवस्थेत होती तिच्या मृत्यूबाबत विचारणा केली असता पती व सासरे यांनी सांगितले कि बेडरूम मध्ये मोनिकाने स्वता गळफास लावून घेतलेला आहे.परंतु हा फास मोनिकाने घेतला नसावा तो दिलेला असावा असा मोनिकाचे वडील दादा सरतापे यांना संशय अल्यानंतर त्यांनी नातेपुते पोलीस स्टेशन येथे पती नेताजी अर्जून धाईंजे,सासरे अर्जुन भीमराव धाईंजे,सासू सौ.विजया अर्जुन धाईंजे,दीर संभाजी अर्जुन धाईंजे सर्व रा. बनकर वस्ती मांडवे व ननंद सौ.गौरी नितीन सरतापे रा.चांदापुरी अशा पाच जणांविरोधात दादा सरतापे यांनी सदर प्रकरणी नातेपुते पोलीस स्टेशन येथे कलम 306 ,498 A , 323, 504, 506, 34 प्रमाणे गुन्हा नोंद केलेला असून सदर गुन्ह्याचा पुढील तपास नातेपुते पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी सपोनि खाडे साहेब करीत आहेत.

चौकट- या लोकांनी पैशासाठी माझ्या भाचीला मारले आहे परंतु माझा न्याय देवतेवर पुर्णपणे विश्वास आहे.त्यामुळे गुन्ह्यांतील सर्व आरोपींना कठोरात कठोर शिक्षा होईल व माझ्या भाचीला न्याय मिळेल

         *उमेश कांबळे,मामा*

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *