संजय राऊतच्या त्या वक्तव्याच्या निषेधार्थ संग्रामसिंह जहागिरदार यांच्या मार्गदर्शनाखाली पिलीव कडकडीत बंद…!

पिलीव/सुजित सातपुते
छत्रपती शिवाजी महाराजांचे थेट तेरावे वंशज तथा माजी खासदार छ.उदयन महाराज व छ.शिवाजी महाराज यांचे सर्व वंशज यांना शिवनेचे नेते संजय राऊत यांनी तुम्हीं छत्रपतींचे वंशज असल्याचे पुरावे सादर करावे असे भडकावू वक्तव्य केल्याने सबंध महाराष्ट्रातील जनतेच्या भावना दुखवल्या आहेत.त्या वक्तव्याच्या निषेधार्थ कृषी व पशु संवर्धनचे माजी सभापती संग्रामसिंह जहागिरदार यांच्या मार्गदर्शनाखाली आज पिलीव गावच्या मुख्य पेठेतून निषेध रॕली काढून कडकडी बंद पाळण्यात आला.यावेळी माळशिरस पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक विश्वंबर गोल्डे यांच्या मार्गदर्शनाखाली पिलीव पोलिसांनी चोख बंदोबस्त बजावला असल्याने पिलीव बंदला कोठे ही गालबोट लागले नाही.सदरच्या निषेध रॕली मध्ये पिलीव गटाचे जि.प सदस्य गणेश पाटील,सरपंच नितीन मोहीते,ग्रा.पं सदस्य अविनाश जेऊरकर,समशेरसिंग राजपूत,लक्ष्मण भैस,नाना मदने यांसह अनेक मान्यवर व शिवप्रेमी सहभागी झाले होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *