पिलीव येथे पल्स पोलिओ लसीकरण मोहीमेचा शुभारंभ..!

पिलीव/प्रतिनिधी
पिलीव येथे प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये 0 ते 5 वर्षे वयोगटातील बालकांना सुदृढ आरोग्यासाठी पल्स पोलिओ लसीकरण मोहिमेचा शुभारंभ करण्यात आला.पिलीव जि.प गटाचे सदस्य गणेश पाटील व पिलीव गावचे सरपंच नितीन मोहीते यांच्या हस्ते बालकांना पोलिओचा डोस पाजून हा शुभारंभ करण्यात आला.
यावेळी पिलीवसह परिसरातील 0 ते 5 वर्षे वयोगटातील बालकांना पोलिओ डोस पाजण्यासाठी पिलीव प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकिय अधिकारी डॉ.संतोष माने-देशमुख व डॉ.अनिरुध्द पिंपळे यांची टिम सज्ज असल्याचे आरोग्या सेविका कोडे आर.जी यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *