पिलीव पत्रकार संघाच्यावतीने रोडवेज कंपनीला निवेदन…!
यात्रे अगोदर रस्त्याचे काम पुर्ण करण्याची केली मागणी….!
पिलीव/प्रतिनिधी
माळशिरस तालुक्यातील पिलीव गावचे ग्राम दैवत श्री महालक्ष्मी देवीची यात्रा येत्या 9 फेब्रुवारी पासून सुरु होत आहे.यात्रा काळात अनेक भाविक-भक्तांची व वाहनांची रहदारी वाढत असते त्यामुळे पिलीव बायपास ते पिलीव विश्रामगृह पर्यंतचा जो उखरलेला रस्ता आहे.त्याचा यात्रेकरूंना व वाहनांना अडथळा होवू नये व यात्राकाळातील वाहतूक सुरळीत चालावी म्हणून पिलीव पत्रकार संघाच्यावतीने रोडवेज कंपनीला निवेदन देवून सदरचा रस्ता त्वरीत पुर्ण करण्याची मागणी करण्यात आली.यावेळी कार्याध्यक्ष प्रा.संजय पाटील,मार्गदर्शक दामोदर लोखंडे,दिव्य मराठीचे अतुल नष्टे व पिलीव पत्रकार संघाचे अध्यक्ष सुजित सातपुते उपस्थित होते.