उद्या अभिनेत्री साक्षी चौधरी पिलीव नगरीत…!
पिलीव/सुजित सातपुते
माळशिरस तालुक्यातील पिलीव ग्रामपंचायतीच्या आयोजित केलेल्या पिलीव फेस्टीवलच्या प्रमुख पाहुण्या म्हणून नियोजित बेधडक पिक्चरच्या अभिनेत्री साक्षी चौधरी या उपस्थित राहणार असून यावेळी लोकनेते उत्तमराव जानकर आदि मान्यवर उपस्थित राहणार असल्याची माहिती पिलीव गावचे विद्यमान सरपंच संग्राम पाटील यांनी दिली.यावेळी फेस्टी्वलच्या निमित्ताने आयोजित केलेल्या मॕरेथॉन स्पर्धेतील तसेच महिलांच्या विविध प्रकारच्या स्पर्धेतील विजेते,जेष्ठ नागरिक,पत्रकार, यांचा तसेच कुपन विजेत्याना बक्षीसाचे वाटप व सन्मान करण्यात येणार आहे. फेस्टीवलमध्ये जि.प.शाळा,आंगणवाडी, बालवाडी,कर्मवीर विद्यालय,जवाहरलाल विद्यालय,इंग्लिश स्कुल,विविध गणेश मंडळाचे कलाकार आपली कला,नृत्य शनिवार दि.2 6/1/2019 रोजी सायं.5 वाजता बचेरी रोडवरील आर्वे मैदानावर सादर करणार आहेत.तरी पिलीव परिसरातील सर्व नागरिकांना मोठ्या संख्येने उपस्थित राहावे.असे सरपंच संग्राम पाटील यांनी अवाहन केले आहे.