कै.अमोल पिसे इंग्लिश मिडीयम स्कुलचे वार्षिक स्नेहसंमेलन संपन्न….!

पिलीव/सुजित सातपुते
शालेय शिक्षण विभाग महाराष्ट्र राज्य यांचेकडे आपली गुणवत्ता प्रमाणित करुन अ श्रेणी मिळवून अग्रेसर ठरलेल्या माळशिरस तालुक्यातील पिलीव येथील श्रीमती किसाबाई शंकर सरगर बहुउद्देशीय संस्था संचलित कै.अमोल पिसे इंग्लिश मिडीयम स्कुलचे (2018-2019) वार्षिक स्नेहसंमेलन सोमवार दिनांक 21 जानेवारी रोजी थाटात संपन्न झाले.सोलापूर विद्यापीठाच्या सिनेट सदस्या स्वरुपाराणी मोहीते-पाटील,राष्ट्रवादीचे माळशिरस तालुकाध्यक्ष संग्रामसिंह जहागिरदार व जिल्हा परिषद सदस्य गणेश पाटील यांच्या हस्ते सदर कार्यक्रमाचे उद्धघाटन करण्यात आले.यावेळी मराठी व हिंदी चित्रपटातील विविध गीतांवर नृत्य सादर करुन चिमुकल्यांनी रसिकांची दाद मिळविली.नृत्य सादर करणार्या प्रत्येक चिमुकल्यांना रसिकांनी टाळ्यांच्या गजरात तर प्रिन्सीपल अंजली उपाध्ये यांनी आपल्या अँकरींगमधून प्रोत्सहान दिले व कार्यक्रम अतिषय रंगतदार बनत गेला.सदर कार्यक्रमाप्रसंगी उपस्थित रसिकांनी चिमुकल्यांसह संस्थापक/अध्यक्ष श्री.सागर सरगर (सर) यांच्यावर कौतुकांचा वर्षाव केला.यावेळी पिलीव गावचे विद्यमान सरपंच संग्राम पाटील,नूतन सरपंच नितीन मोहीते,निमगावच्या सरपंच सौ.आरती मगर,अॉरबीट क्रॉप सायन्सचे डॉ.उत्तमराव सरगर,पो.ना अभिजीत मोहळकर,पो.कॉ स्वप्निल गायकवाड यांसह विविध क्षेत्रातील अनेक मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *