हिंदुहृदयसम्राट वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्ताने युवासेनेकडून विविध उपक्रम
पिलीव अपडेट/अकलुज
हिंदुहृदयसम्राट सरसेनापती शिवसेनाप्रमुख वंदनीय बाळासाहेब ठाकरे व नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या जयंतीनिमित्ताने माळशिरस तालुक्यातील युवसैनिकांनी शिवसेना उपनेते जिल्हासंर्पकप्रमुख आमदार मा.श्री तानाजीराव सांवत व जिल्हाप्रमुख संभाजीराजे शिंदे युवासेना राज्य विस्तारक नगरसेवक उत्तमजी आयवळे यांच्या मार्गदर्शनाखाली विविध ठिकाणी प्रतिमेचे पूजन करून शैक्षणिक साहित्य, खाऊ वाटप, तसेच रक्तदान शिबीराचे आयोजन केले.
सर्वप्रथम प्रतिमेचे पूजन शिवसेना कार्यालय अकलूज येथे शिवसेना उपजिल्हाप्रमुख दत्ता (आबा) पवार, तालुकाप्रमुख नामदेवराव वाघमारे, युवासेना जिल्हायुवाधिकारी स्वप्निल वाघमारे, ऑड विरेंद्र वाघमारे यांच्या उपस्थितीत झाले.
पंचायत समिती, माळशिरस येथील कार्यालयात उपसभापती श्री किशोरजी सूळ, पं. स. सदस्य श्री अर्जुनसिंह (दादासाहेब) मोहिते पाटील, गट विकास अधिकारी श्री अमोलजी ताकभाते, ऑड कुलकर्णी सो। यांच्या उपस्थितीत पार पडले.
तसेच तालुक्यातील करुंडे, नातेपुते, पांढरे वस्ती- फोंडशीरस येथे जयंतीनिमित्त विध्यार्थ्यांना शालेय उपयोगी शैक्षणिक साहित्य व खाऊ वाटप करण्यात आले, त्याच प्रमाणे
मौजे नातेपुते येथील लोकशाहीर अण्णाभाऊ साठे चौक येथे स्थानिक लांडगे ग्रुप , ग्रामस्थ, युवक, शिवसेना, युवासेना यांचे वतीने जयंती निमित्त सुमारे १४० रक्तदात्यांनी रक्तदान केले व याही वर्षी रक्तदान शिबिराची परंपरा सुरू ठेवली.
या कार्यक्रमांसाठी पं स सदस्य श्री माऊली पाटील, मामासाहेब पांढरे, उपतालुका प्रमुख अमोल उराडे, कारूंडेचे सरपंच अमरजी जगताप, विजय रूपनावर, आदिक उराडे, विनोदभैया लांडगे, शुभम लांडगे, महेश लांडगे, समिरभाई शेख, दत्तात्रय गोरे, सचिन करे, प्रवीण लोणारी, सनी गवळी, अजय बनकर यांच्या सह स्थानिक त्या त्या ग्रामपंचायत सदस्य, ग्रामस्थ शिवसैनिक, युवासैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.