राष्ट्रवादी काॅग्रेस पार्टीच्या माळशिरस तालुका कार्याध्यक्षपदी संजय गोरवे यांची निवड

सचिन करडे/खुडूस

माजी उपमुख्यमंत्री खा.विजयसिंह मोहिते-पाटील यांच्या नेतृत्वाखाली व मा.खा.रणजितसिंह मोहिते-पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सोलापूर जिल्ह्याचे युवा नेते
धैर्यशिल मोहिते-पाटील यांच्या हस्ते
राष्ट्रवादी काँग्रेसच्या विविध सेलच्या माळशिरस तालुक्यातील निवडी जाहीर करण्यात आल्या आणि नियुक्ती पत्र देण्यात आले यावेळी संजय गोरवे यांची कार्याध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस माळशिरस तालुका ( सामाजिक न्याय विभाग) पदी निवड करण्यात आली संजय गोरवे यांनी गेली बरिच वर्ष राष्ट्रवादी काॅग्रेसच्या माध्यमातुन अनेक कार्यक्रम व दांडगा जनसंपर्क असल्याने त्यांच्या निवडीने स्वाभिमानी होलार समाज संघटनेच्या वतीनेही सत्कार करण्यात आला असून आगामी निवडणुकांत त्यांच्या निवडीने स्वाभिमानी होलार समाजाचा संपुर्ण ताकद ही खा. विजयदादांच्या पाठीमागे व पक्षाच्या पाठीमागे ठेवणार असल्याचे गोरवे यांनी सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *