प्रहार अपंग क्रांती आंदोलन व अपंग बेरोजगार क्रांती संघटनेचे प्रमुख मागण्यांसाठी तीव्र आंदोलन

पिलीव/सुजित सातपुते
जिल्हाधिकारी तथा जिल्हा दंडाधिकारी कार्यालय सोलापूर येथे शनिवार दि.26_जानेवारी _2019 रोजी सकाळी 07:00 वा.अपंग क्रांती आंदोलन महाराष्ट्र राज्य व अपंग बेरोजगार क्रांती संघटना महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने खालील प्रमुख मागण्यासांठी तीव्र आंदोलन करण्यात येणार असल्याचे श्री.विजय (काका) कुलकर्णी यांनी पिलीव अपडेटशी बोलताना सांगितले.
प्रमुख मागण्या खालीलप्रमाणे :-

1)माळशिरस तालुक्यातील सुमारे 800 वंचितांना अॉनलाईन सर्टिफिकेट मिळावे.

2)2014 ते 2017 चा 3% अपंगांचा निधी वाटप करावा.

3)विजय वसंत कुलकर्णी यांचि थकीत असणारी आर.आर.सी रक्कम वसूल करुन मिळावी.

4)आपंगांना विनाअट घरकुल मिळावे.

5)आपंगांना हक्कापासून वंचित ठेवणार्यां संबिधित अधिकार्यांवर व राजकीय नेत्यांवर ॲट्रासिटी ॲक्ट 2016 नूसार गुन्हें दाखल करावे.

6)माळशिरस तालुक्याचे गटविकासाधिकारी अपंगांची हेळसांड करत असल्याची चौकशी करावी.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *