माळशिरस तालुक्यात युवासेनेची गडकिल्ले स्वच्छता मोहीम….!
पिलीव/सुजित सातपुते
युवासेना प्रमुख शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांच्या आदेशानुसार युवासेना सचिव वरूनजी सरदेसाई यांच्या नेतृत्वाखाली शिवसेना जिल्हासंपर्कप्रमुख आ.तानाजी सावंत व जिल्हाप्रमुख संभाजीराजे शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली युवासेना सोलापूर जिल्हा माढा लोकसभा यांच्या वतीने युवासेना राज्य विस्तराक उत्तम आयवळे यांच्या प्रमुख उपस्थितीत माळशिरस तालुक्यातील पिलीव येथील ऐतिहासिक कालीन भुयकोट किल्ल्यामध्ये स्वच्छता मोहीम राबवण्यात आली.
मोहिमेची सुरवात छत्रपती शिवाजीराजे महाराज यांच्या प्रतिमेचे व त्याकाळी युद्धात वापरण्यात आलेल्या शस्त्रांचे पूजन करून केली.
पिलीवचा हा किल्ला जहागीरदार यांचा असून या किल्लाचा खूप मोठा रक्तरंजित इतिहास आहे व त्यांचेच सध्याचे वारसदार श्री समरजितसिंह अजितसिंह जहागीरदार, श्री पेरसिंह जहागीरदार, श्री मानसिंह जहागीरदार, यांच्या उपस्थितीत ही मोहीम पार पाडली , किल्यावरील झाडी झुडपे , गवत, प्लास्टिकच्या पिशव्या, कागद याची स्वछता करून युवासेनेनी एक अनोखी मोहीम राबिवली आहे. या मोहिमेची सर्वत्र कौतुकास्पद चर्चा सुरू आहे.
या मोहिमेचे आयोजन युवासेना जिल्हायुवाधिकारी मा श्री स्वप्निल वाघमारे यांनी केले या मोहिमेत सुभाष भोसले, शंकर मेटकरी, दिलीप देशमुख, दत्तात्रय गोरे, समिरभाई शेख, सुभाष काकडे, सचिन करे, रणजितसिंह गायकवाड, गणेश बनकर, पंकज कारंडे, तुषार वाघमारे, प्रवीण माने, सुनील लेनगरे, संतोष मदने, अजय बनकर, बिरुदेव शिंदे तसेच मोठ्या संख्येने शिवसैनिक युवासैनिक यांनी श्रमदान दिले व ही मोहीम यशस्वी पार पडली.