खुडूस येथील पाणी पूरवठा योजनेस ४४.६०लाख रूपयांचा निधी मंजुर
सचिन करडे/खुडूस
खुडूस ता. माळशिरस ग्रामपंचायतीस राष्ट्रीय ग्रामिण पयेजल योजना अंर्तगत कांचनगर नळ पाणी पूरवठा योजनेस ४४.६oलाख रुपयांचा निधी मंजूर झाल्याची माहिती सरपंच सौ. वंदना सरगर व उपसरपंच डॉ. तुकाराम ठवरे यांनी दिली. यावेळी पं.स. सदस्य अजय सकट, माजी सरपंच रंजना ठवरे, वनिता माने, माजी उपसरपंच वंसतराव निकम, रामचंद्र दोलतडे, ग्रामपंचायत सदस्य महादेव साठे,शारदा भोपळे, सविता गोरवे, रेखा कांबळे, सुरेखा बनकर आदी उपस्थित होते. खुडूस ग्रामपंचायतीस कांचननगर येथे नळ पाणी पूरवठा योजनेसाठी राष्ट्रीय ग्रामिण पेयजल योजना या योजने अंर्तगत ४४.६0 लाख रुपयांचा निधी मंजूर झाला असून यामध्ये खुडूस ग्रामपंचायत कार्यक्षेत्रातील कांचननगर येथील वस्त्यांमध्ये नळ पाणी पूरवठा योजना मार्गी लागणार असून, नुकतीच या योजनेसाठी मुख्य अभियंता पूणे प्रादेशिक विभाग यांचे तांत्रीक छाननी समितीने तत्वःता मंजूरी दिली असुन, प्रशासकिय मान्यता, अंदाजपत्रके तयार असून लवकरच या योजनेची निविदा करून सदर योजना लवकरच मार्गी लागेल. सदर योजना मंजूरी साठी पालकमंत्री मा.ना. विजयकुमार देशमुख, पाणी पुरवठा राज्यमंत्री मा.ना.सदाभाऊ खोत, जिल्हा परिषद अध्यक्ष संजयमामा शिंदे, शेतकरी साखर कारखान्याचे चेअरमन उत्तमराव जानकर यांनी विषेश प्रयत्न केले असुन, माजी सभापती मच्छींद्र ठवरे, माजी सरपंच अॅड. शहाजी ठवरे यांचे सहकार्य व मार्गदर्शन लाभले असुन सर्व ग्रामस्थांच्या सहकार्याने सदर योजना लवकर मार्गी लावू असे सरपंच वंदना सरगर व उपसरपंच डॉ. तुकाराम ठवरे यांनी सांगितले.
खुडूस कांचनगर येथील वाढती लोकसंख्या लक्षात घेता, पूर्वीची पाणीपूरवठा योजना खुपच अपूरी होती, नागरिकांना पाणी टंचाईचा खुपच सामना करावा लागत होता, सदर भागामध्ये मोठी योजना होणे फारच गरजेचे होते यासाठी ग्रामपंचायतीचे उपसरपंच डॉ. तुकाराम ठवरे यांनी वेळोवेळी मा.मंत्रीमहोदय, जि.प. अध्यक्ष व संबधित अधिकारी यांचेकडे वारंवार पाठ पूरावा करुन सदर योजना मंजूरी साठी विषेश योगदान दिले, त्यामुळे नागरिकांनमधून समाधान व्यक्त होत आहे.
अॅड. शहाजी ठवरे,माजी सरपंच