अकलूज येथे प्रांत कार्यालयासमोर क्रांतिकारी संघर्ष सेनेचे खोऱ्या,पाट्या आंदोलन

पिलीव अपडेट टीम/अकलुज
मौजे, अकलूज प्रांत कार्यालय समोर तालुका माळशिरस जिल्हा सोलापूर येथे क्रांतिकारी संघर्ष सेना( महाराष्ट्र राज्य )संस्थापक अध्यक्ष सुधीरभाऊ साठे व प्रदेशाध्यक्ष गणेश भोसले यांच्या नेतृत्वाखाली खोऱ्या, पाट्या आंदोलन करण्यात आले.
म्हसवड ते टेंभुर्णी नवीन रोडचे काम चालू आहे रस्त्याचे काम चालू असल्यामुळे नागरिकांना मोठ्या प्रमाणात त्रास सोसावा लागत आहे. नागरिकांना येण्या-जाण्यासाठी जीव मुठीत घेऊन जावे,यावे लागत आहे. रस्ता उकरून ठेवल्यामुळे माती चेहऱ्यावर व तोंडावर येत आहे. त्याच्यामुळे अपघात होत आहेत. कित्येक जणांना आपला जीव मुठीत घेऊन गाडी चालवावी लागत आहे. शेतकऱ्यांच्या पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. सर्वसामान्य नागरिकांना विनाकारण त्रास सोसावा लागत आहे. या रस्त्यावर अपघाताचे प्रमाणात वाढ झालेली आहे. काही जणांचे जीव सुद्धा गेलेले आहेत. अपघाताचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहेत. असे अपघात झाले तर ठेकेदार व रस्त्याचे काम घेणाऱ्या कंपनीवर कठोरातील कठोर कारवाई करण्यात यावी. गणेशगाव पाटी या ठिकाणापासून आंदोलनाला सुरुवात होईल येथील रस्त्याचे खड्डे बुजवून, पाणी मारून, रेडियम लावून प्रांत कार्यालय अकलूज येथे कार्यालयासमोर १६/१/२०१९ रोजी खोऱ्या, पाट्या आंदोलन करण्यात आले.
यावेळी सोलापूर जिल्हा अध्यक्ष दीपक साठे, सोलापूर जिल्हा उपाध्यक्ष बंडू कांबळे, माढा तालुका अध्यक्ष मोहन खंडाळे, माळशिरस तालुका अध्यक्ष विनोद भोसले ,उपाध्यक्ष आनंद दळवी, माळशिरस तालुका संघटक चंद्रकांत भोसले, माळशिरस तालुका सरचिटणीस चंद्रकांत कोळी, माळशिरस तालुका रतन ठोकळे, माळीनगर शाखाध्यक्ष मल्हारी अष्टुळ, बाबरी पूल शाखाध्यक्ष भारत देवकुळे,मानव अधिकारी संघटना सोलापूर जिल्हा अध्यक्ष संतोष मगर , माहिती सेवाभावी संघटनेचे सोलापूर जिल्हा अध्यक्ष महेंद्र साठे आदी कार्यकर्ते उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *