माळशिरस तालुक्यातील विविध मागण्याबाबात भाजप प्रदेशाध्यक्ष दानवे यांची सदस्यांनी घेतली भेट


पिलीव अपडेट टीम/माळशिरस
माळशिरस तालुक्यातील रस्ते,एमआयडीसी सह विविध विकासकामाच्या मागण्याबाबात भाजपाचे प्रदेशाध्यक्ष खा.रावसाहेब दानवे यांची भाजपाच्या जिल्हा परिषद व पंचायत समिती सदस्यांनी भेट घेऊन चर्चा केली
यावेळी खा. रावसाहेब दानवे यांचे स्वागत भाजप नेते ,माजी पंचायत समिती सदस्य के के पाटिल ,पंचायत समितीचे भाजपाचे गटनेते रणजितसिह जाधव,पं .स .सदस्य अजय सकट ,पक्षनेते माऊली पाटिल,गौतम माने यांनी केले यावेळी तालुकाध्यक्ष सोपान नारणवर,सरचिटणीस संजय देशमुख,जि प सदस्या ज्योती पाटिल,साक्षी सोरटे,संगीता मोटे,अर्जुन धाइजे,संजय मोटे,प्रभाकर इंगळे सरदेशमुख,बुवासाहेब शिंदे ,महेश सोरटे उपस्थित होते
भाजपचे प्रदेशाध्यक्ष खा.रावसाहेब दानवे हे अकलूज येथे माढा लोकसभा मतदारसंघातील तालुकाध्यक्ष व प्रमुख पदाधिकारी यांच्या बैठकीसाठी आले होते यावेळी जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या सदस्यांनी त्यांची भेट घेऊन सत्कार केला व तालुक्याच्या विकासकामाचे निवेदन दिले माळशिरस तालुक्यातील एमआयडीसीबाबत मुख्यमंत्र्यांकडे बैठक लावावी ,तालुक्यातील भांब-गिरवी,खडूस-अकलुज,पिलीव-माळशिरस,झंजेवाडी-खुडूस ,गिरवी -कण्हेर -इस्लामपूर या रस्त्यांना बजेट मधून निधी उपलब्ध व्हावा,तालुक्यातील दुष्काळ भागातील जळभावी,भांब,रेडे,
पठाणवस्ती,शिन्गुर्नी,बचेरी,
गारवाड ,फडतरी,गिरवी,या गावांत त्वरित टॅंकर सुरु करावेत ,जलयुक्त शिवार अभियानात तालुक्यातील 27 गावे घेण्यात यावीत,तालुक्यातील आरोग्य केंद्रातील 14 वैद्यकीय अधिकार्यांची तसेच माळशिरस व नातेपुते ग्रामीण रुग्णालयातील वैद्यकीय अधिकार्यांची पदे भरावीत अश्या मागण्या खा.दानवे यांच्याकडे केल्या या लवकरच सोडविल्या जातिल असे अश्वासन त्यांनी दिले

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *