खुडूस गावच्या विकासकामांसाठी २५ लाख रूपयांचा निधी मंजुर_

खुडूस / सचिन करडे

ता. माळशिरस ग्रामपंचायतीच्या विकास कामांसाठी अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकांच्या वस्त्यांचा विकास करणे या योजनेतुन २५लाख रुपयांचा निधी मंजूर झाल्याची माहिती सरपंच सौ. वंदना सरगर व उपसरपंच डॉ. तुकाराम ठवरे यांनी दिली. यावेळी पं.स. सदस्य अजय सकट, माजी सरपंच रंजना ठवरे, वनिता माने, माजी उपसरपंच वंसतराव निकम, रामचंद्र दोलतडे, ग्रामपंचायत सदस्य महादेव साठे,शारदा भोपळे, सविता गोरवे, रेखा कांबळे, सुरेखा बनकर आदी उपस्थित होते. खुडूस ग्रामपंचायतीस विकास कामांसाठी अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकांच्या वस्त्यांचा विकास करणे ( दलित वस्ती सुधार योजना ) या योजने अंर्तगत २५ लाख रुपयांचा निधी मंजूर झाला असून यामध्ये खुडूस ग्रामपंचायत कार्यक्षेत्रातील विविध वस्त्यांमध्ये सिमेंट काँक्रीट रस्ते करणे, रस्ता दुरूस्ती करणे, पेव्हर ब्लॉक बसविणे, हायमस्ट दिवे उभा करणे, एल.ई.डी. दिवे बसविणे, बंदिस्त गटार तयार करणे आदि कांमांचा समावेश असून लवकर या कामांचे अंदाजपत्रके तयार करून, निविदा करून कामे मार्गी लावले जातील.सदर योजना मंजूरी साठी जिल्हा परिषद अध्यक्ष संजयमामा शिंदे, शेतकरी साखर कारखान्याचे चेअरमन उत्तमराव जानकर, समाजकल्याण सभापती सौ. शिलाताई शिवशरण, माजी सभापती मच्छींद्र ठवरे, माजी सरपंच अॅड. शहाजी ठवरे यांचे सहकार्य व मार्गदर्शन लाभले असुन सर्व ग्रामस्थांच्या सहकार्याने गावचा विकास करू असे सरपंच वंदना सरगर व उपसरपंच डॉ. तुकाराम ठवरे यांनी सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *