विधी सेवा समितीच्यावतीने बचेरी येथे कायदेविषयक मोफत मार्गदर्शन शिबीर संपन्न.

पिलीव/सुजित सातपुते
माळशिरस तालुका विधीसेवासमिती, पंचायत समिती माळशिरस, वकील संघटना आणि ग्रामपंचायत बचेरी यांच्या संयुक्त विद्यमाने बचेरी येथे मोफत कायदेविषयक मार्गदर्शन व सल्ला शिबीराचे आयोजन करण्यात आले होते. अध्यक्षस्थानी माळशिरस न्यायालयाचे जिल्हासत्र न्यायाधिश पठारे साहेब होते. यावेळी वरिष्ठस्थर दिवाणी न्यायाधिश क्षीरसागरसाहेब,कनिष्ठ स्थर न्यायाधिश, शेखसाहेब, तसेच वकील संघटनेचे अध्यक्ष,ॲड.भोसले, सरकारी वकील, संग्राम पाटील, वकील ,परकांडे, आडत, अजय घाटे, सौ.आसावरी घाटे, शिकारे, मानसिंह जहागिरदार, जयंत पाटील,सरपंच श्रीमती कुसुम माने, उपसरपंच सुदाम शिंदे, विनोद काटे, शंकर शिकारे, पोपट गटकुळे, महादेव गाढवे गुरूजी, शिवाजीराव सावळजकर, ग्रामसेवक, सतीश उरवणे, ग्रामस्थ उपस्थित होते.प्रास्ताविकात ॲड आडत यानी शिबीराचा हेतू सांगताना पिडीय व्यक्ती पैशाअभावी ,कायदेशिर मदतीशिवाय न्यायापासून वंचित राहू नये म्हणून, अर्थिकद्रष्ठ्य दूर्बल घटकातील, दारिद्ररेषेखिलील, अनुजाती जमाती, निराधार, विधवा,अल्पवयीन अनाथ,व्यक्तीना, विधीसेवा समितीकडून, वकील, कायदेशिर सल्ला,नियमाप्रमाणे अर्थिक सहाय्य, व दावा दाखल केला जातो अशी माहिती दिली.यावेळी, परकांडे वकीलानी त्तृत्तीय पंती व्यक्तीचे हक्क, सर्वसामान्य माणसाला मिळतात तसेच मिळत असतात व त्याना त्यांच्या मालमत्तेसाठी कायदेशिर दत्तक घेऊन वारस नेमता येत आसल्याची तरतूद कायद्यात आसल्याचे नमूद केले, तसेच त्यानी कौटुंबिक हिंसाचार, लैंगिक शोषण याविसयाच्या कायद्याची सविस्तर माहिती दिली. सरकारी वकील, संग्राम पाटील यानी, म्रुत्यूपत्र व त्यांच्या ईच्छापत्राचे कायदेशिर महत्वाच्या कायद्याची सविस्तर माहिती दिली.ॲड.सौ.आसावरी घाटे यांनी रामायण, महाभारत काळापासून, महिलावर अन्याय ह़ोत आले उ,घरगूती हिंसाचार,महिलेकडे भोगवस्तू म्हणूनच पाहिले जाते, कायद्यातील कलम 498.च्या कायद्याची माहिती सांगताना घरातच छळ, मानसिक छळ, शारिरिक छळ, अवास्तव मागणी.व अपेक्षा ठेवल्या जातात व त्याची पूर्तता न झालेश वेळप्रसंगी जीवंतही जाळले जाते, त्याचा कायदा 376चे बलात्काराचा व विनयभंग, छेडछेडीच्या कायद्याची सविस्तर माहिती दिली. तर मानसिंह जहागिरदार वकीलानी, वारसाच्या हक्काच्या कायद्याची माहिती सांगताना1925,1956,2005, 1994च्या कायद्यातील झालेल्या बदलाची माहिती सांगताना मुलाप्रमाणे मुलीलाही वडिलाच्या मिळकतीत समान हिस्सा मिळणेची तरतूद करण्यात आली आहे,अध्यक्षीय भाषणात, न्यायाधिश पठारे साहेब यानी शिबिरामुळे गुन्हेगारीलाआळा घालण्यासाठी, लोकाना कायदा माहित व्हावा, घरातूनच होणारा अन्याय, अत्याचाराला आळा बसावा, किरकोळ कारणावरून कायदा माहित नसलेने व त्याचे परिणाम माहित नसलेने गुन्हे घडतात तसे गुन्हे घडू नयेत, समाजप्रबोधन व्हावे या हेतूने अशी शिबीरी घेतली जात आहेत. कौटुंबिक हिंसाचार, अत्याचार, मानसिक, शारिरिक, अर्थिककारणासाठी होणारे गुन्हे, महिलाना समान हक्क मिळवून देण्यासाठी, भावाप्रमाणे बहिणीलाही समान संधी व हक्क आहे, बालकांचे लैंगिक शोषण, विस्थापितांचे पूनर्वसन करण्यासाठी कायद्यात तरतूद करण्यात आली आहे. नागरिकाना च़ागल्या वाईट परिणामाच्या कायद्याची माहिती मिळावी,या हेतूने गुन्हेगारीवर प्रतिबंध व्हावा सामाजिक प्रबोधन व्हावे यासाठी हे विधीसेवासमितीच्या वतीने कायदेविषयक शिबीराचे आयोजन करण्यात आले. आसल्याने नागरिकानी लाभ घ्यावा असे अवाहन केले. सुत्रसंचलन व प्रास्ताविक ॲड.दत्तात्रेय आडत तर आभार प्रदर्शन ॲड.जयंत पाटील यांनी मानले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *