खुडूस येथे सुदैवाने मोठा अनर्थ टळला…!
सचिन करडे/खुडूस
खुडूस येथील नवीन वसाहतीतील अनिल उत्तम उबाळे यांच्याकडे भारतगॅस या कंपनीचे कनेक्शन आसुन ते गावातीलच सारंग ठवरे यांच्या शांतिनाम गॅस एजन्सीचे असुन नुकतीच उबाळे यांनी शांतिनाम भारत गॅसचे गोडावुन येथुन गॅसची टाकी भरून आणली होती व ति चेकही केल्याचा दावा त्यांच्यासोबत गेलेले विकास काटे यांनी केला असुन सुमारे सातच्या सुमारास उबाळे यांनी घरी गॅस चालु केला असता अचानक गॅसने पेट घेतला ते दृश्य पाहुन उबाळे घाबरून आपल्या लहान मुलांसह बाहेर पळाले व शेजारीच असणारे श्याम कांबळे यांनी पेटत्या गॅस टाकीवर मातीचा ढीग टाकुन आग आटोप्यात आणली ही वार्ता वार्यासारखी गावात पसरली व गल्लीतील सर्व नागरीकांनी आपले गॅस बंद करून उबाळे यांच्या घरी ऐकच गर्दी केली
गॅस एजन्सीचा कोणताच कर्मचारी सुमारे तास ते दीड तास न फीरकल्याने नागरीकांचा असंतोष पहायला मिळाला व नंतर शांतिनाम भारत गॅस एजन्सीचे मालक खुडूस येथील सारंग ठवरे दोन कर्मचार्यासह घटनास्थळी आले व टाकीजवळ असणारा रेगुलेटर सिद्धार्थ काटे यांच्या सहकार्याने बाजुला काढला व गॅस टाकी रेगुलेटरसह शेगडी घेउन गेले व नंतर नागरीकांनी सुटकेचा निश्वास सोडला….
काहीका असेना नागरीकांनीही व महीलांनीही गॅसच्या बाबतीतही स्वतः काळजी घेणे गरजेचे आहे