पत्रकार हा समाजाचा आरसा आहे-चेअरमन रणजितसिंह मोहिते-पाटील


सचिन करडे/खुडूस

पत्रकारांचे काम समाज उपयोगी असुन समाजात घडलेल्या घटनेची तीव्रता कमी करून त्याची योग्य माहिती समाजात पोहचवण्याचे काम पत्रकार करत असतात.त्यामुळे पत्रकार हे समाजाचा आरसा म्हणून ओळखला जातो. पत्रकारांनी  धावपळीच्या जीवनात आरोग्याची काळजी घ्यावी असे मत श्री शंकर सहकारी कारखाना सदाशिवनगर चे चेअरमन तथा माजी खासदार रणजितसिंह मोहिते पाटील यांनी व्यक्त केले.सहकार महर्षि शंकरराव मोहिते पाटील यांची 101 वी जयंती,खासदार विजयसिंह मोहिते पाटील यांच्या अमृतमहोत्सवी वाढदिवसाच्या निमित्ताने व मराठी पत्रकारितेचे जनक,दर्पणकार आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या जयंतीनिमित्त पत्रकारांच्या सत्काराचे आयोजन श्री शंकर सहकारी कारखाना सदाशिवनगर येथे सन्मती सेवा दल सदाशिवनगर चे सचिव प्रशांत दोशी यांनी केले होते.याप्रसंगी ते बोलत होते.यावेळी बोलताना कारखान्याचे अध्यक्ष रणजितसिंह मोहिते पाटील म्हणाले,आमदार ,खासदार जसे पर्मनंट नसतात तसेच पत्रकार ही पर्मनंट नसतात.सहकार महर्षी काकासाहेब यांची नात माळशिरस पंचायत समितीच्या सभापती सौ वैष्णवीदेवी मोहिते पाटील यांच्या हस्ते व पत्रकारांच्या हस्ते आज कारखाना स्थळावर वृक्षारोपण करण्यात आले.या कार्यक्रमासाठी व्यासपीठावर माळशिरस पं. स.च्या सभापती सौ वैष्णवीदेवी मोहिते पाटील, उपसभापती किशोर सूळ, पंचायत समिती सदस्य अर्जुनसिंह मोहिते पाटील,हसीना शेख,जि प सदस्य अरुण तोडकर,सौ सुनंदा फुले,बाजार समितीचे उपसभापती मामा पांढरे,यासह कारखान्याचे सर्व संचालक व माळशिरस तालुक्यातील सर्व पत्रकार बंधू उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *