थोरांच्या देशात चोरांची घुसखोरी

पुणे/विकास साळवे

गे ल्या अनेक वर्षात इथल्या भारतीय जनतेने सत्ता परिवर्तनाच्या लढाया बघितल्या,कधी धर्माच्या नावावर तर कधी पैशाच्या जोरावर,कधी भावनेच्या आखाड्यात तर कधी विचारांच्या पखाड्यात,या सर्व लढाईत भरडली गेली ती सामान्य जनता,कळलेच नाही कोण आपुला नि कोण परका,दाखवणारी दातं आणि खाणारी दातं वेगळीच ठेवल्या गेली,जनता मात्र आयुष्याच्या शेवटपर्यंत आपल्या न्याय हक्कासाठी वाट पहात राहीली,धर्म,पैसा,भावना,विचार अबाधित ठेवुन कधी रस्त्यावरची मोर्चे आंदोलनाची लढाईही लढत राहीले,यातुन दलाल जन्माला आले आणि जनता पुन्हा आहे तशीच हक्कांपासुन वंचित राहीली,जन्माला आलेल्या मुठभर दलालांनी जनता मात्र वेठीस धरून त्यांचा विश्वासघात केला व त्यावर राजकारण करत राहीले,आपापल्या पदरात काहीना काही पाडुन घेत स्वार्थी पोट व घर भरत राहीले,अशा परिस्थित सामान्य जनतेनं काय करावं हा प्रश्न कायम मनात घर करून आहे.
विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी जीवाचं रान करून आमच्या सक्षम जगण्याचा सक्षम आराखडा त्यांच्या हयातीत करून ठेवला,परंतु तो आराखडा बाजुला सारत प्रत्येकजण प्रती बाबासाहेब होण्याच्या तयारीत स्वत:चा आराखडा तयार करत बसले,परंतु तो आजतागायत कुणाकडुनही तयार झालेला पहायला मिळत नाही,जी परिस्थिती ज्यांनी भोगली त्या परिस्थितीची जाणीव त्याच व्यक्तीला असु शकते,त्यावर तोच व्यक्ती लिहू शकतो तथा भाष्य करू शकतो,परंतु अर्ध्या हळकुंडाने पिवळे झालेल्या बांडगुळांना कोण समजावणार,काळ आता आमच्यावर स्वार झाला आहे,या थोरांच्या देशात चोरांनी घुसखोरी केली आहे,या देशावर चोरांनी कब्जा केला आहे,तरीही आम्ही अजुन गाफिलच आहोत ही मोठी शोकांतिका आहे,क्रांती प्रतीक्रांती हा जगात होतच असते परंतु तीला काही वर्ष लोटावी लागतात,परंतु आता या देशात पुन्हा प्रतीक्रांतीने थैमान घातले आहे,विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकरांच्या केलेली न भुतो न् भविष्यती अशी क्रांती परंतु बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाणानंतर क्रांतीला अवघे काही वर्षे लोटली न लोटली तोवरच आपल्यातला स्वार्थी गटबाजीमुळे ही प्रतिक्रांती आपल्या मानगुटीवर येऊन बसली,याची जराही जाण अन् भान आपल्या स्वार्थी पुढा-यांना असल्याचे दिसत नाही,मतभेद आणि मनभेद विसरून सर्वांनी संपुर्ण ताकदीनिशी या मनुवादी पेशवाईचा सामना करायला हवा होता,ही नवपेशवाई जीला समतावादी देश पसंत नाही,ज्यांना माणसांची डोकी जनावरांसारखी पुन्हा धर्मांधात गुलाम ठेवायची आहेत,अशा पेशवाईला गाडायला हवे होते,परंतु शुन्य कर्तृत्व घेऊन स्वार्थी नेतृत्व उभे करण्याच्या भानगडीत समाज पार दावनीला बांधला,नवपेशवाई मात्र तोडा फोडाचे विकृत राजकारण करत नेत्यांना कधीही एक होऊ दिले नाही,त्याचाच परिणाम म्हणुन नवपेशवाईने पुन्हा डोके वर काढले आहे.शोषित,पिडीत,वंचित घटकातील लोकांपासुन ते प्रस्थापितांपर्यंत सगळ्यांनाच समतेच्या धाग्यात बांधणारे या देशाचे भारतीय संविधान व हा भारत देश असतांना नाहकपणे विषमतावादी धोरण राबवुन देशाला नासवणारी ही मनुची औलाद देशाला वेगळ्या वळणावर नेऊ पहात आहे,या औलादीला रोखायचे असेल तर चळवळीच्या वेगवेगळ्या चुली मांडण्यापेक्षा एकाच विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या अर्थातच आपल्या घरात परतण्याची वेळ आलेली आहे आणि याच घरात येऊन बाबासाहेबांनी उभारलेल्या राजगृहात येऊन बाबासाहेबांनी दिलेल्या देश व माणसांच्या विकासाचा आराखडा राबविला पाहीजे तरच आपले भवितव्य अबाधित राहील अन्यथा पुन्हा गुलामीत जावुन कमरेला झाडू अन् गळ्यात मडके आल्याशिवाय रहाणार नाही,ही बुध्दांची भुमी असुन इथल्या मातीत बुध्दांचा व बाबासाहेबांचाच समतावादी माणसांना जोडणारा विचार रूजला आहे,याच विचारांच्या वाटेवरती तुम्हा आम्हाला जाणे आहे,येणारा काळ सोकावतो आहे,आता इथल्या जनतेला हा विचार करायचा आहे की,समतावादी युगात जगायचे की विषमतावादी युगात मरायचे,माणुस म्हणुन जगायचे की अमानुषपणे मरायचे,संविधानामुळे आज आपण स्वतंत्र आहोत,मग स्वतंत्र्यात जगायचे की गुलामी तडफडून मरायचे,हे शेवटी ज्याच्या त्याच्या हातात आहे,या देशात अनेक प्रकारचे प्रयोग करून विषमतावादी मनुची पिलावळ आपला अंत पहात आहे,आपण स्वत:ला जर बुध्दांचे व विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकरांचे अनुयायी म्हणत असु,चळवळीचे शिलेदार म्हणत असु तर मग जागे व्हा,समोर आलेल्या परिस्थितीवर मात करू या,कारण या थोरांच्या देशात चोरांनी घुसखोरी केली आहे,बुध्दीचं पॉकेट मारण्याचे काम जोरात सुरू झालं आहे,अनेकांच्या बुध्दीची बत्ती गुल्लं झाली आहे,म्हणुन सावध रहा व्हा,
भिमा तुझ्या विचारांचे आम्ही वारसदार आहोत,
तुझ्या विचारांचे रक्षण करणारे सरदार आहोत..
दाखवुन देऊ या देशातील नव पेशवाईला,
या देशाच्या प्रवेशद्वारावरचे आम्ही खरे पहारेदार आहोत..

जयभिम

विकास साळवे,पुणे
+919822559924..✍

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *