रिक्षा चालकांची रणजितदादांकडे धाव…!

सचिन करडे/खुडूस

रिक्षा चालवणार्या चालकांना दररोज नवनवीन समस्यांना सामोरे जावे लागत असताना व पेट्रोल डीजेलचे वाढते दर यामुळे आधिच मेटाकुटीला आलेल्या रीक्षाचालकांचे पोलिसांकडुन वेळोवेळी दंडात्मक दोन हजार रूपयेच्या पावत्या फाडल्या जातात व ती पावतीही एकच दिवस चालेल असा अजब सल्लाच ट्रॅफीक पोलिस देतात यामुळे रीक्षाचालकांत कमालीची चिंता वाढली असुन घर परीवार व व वाढते डीझेलचे भाव यामुळे आधीच मेटाकुटीला आलेल्या रीक्षाचालकावर उपासमारीची वेळ आली असुन सुमारे ४० ते ५० रीक्षाचालकांनी  आपल्या रीक्षांचा ताफा शिवरत्न येथे वळवला येथे शंकर सहकारी साखर कारखान्याचे नुतन चेअरमन माजी खासदार रणजितदादांची भेट घेतली तसेच रणजितदादांनीही रीक्षाचालकास रीक्षा व्यवस्थित चालवुन तसेच परवाने काढुन घेण्यास सांगितले व पोलिस निरीक्षक सुर्वे साहेब यांना फोन करून या वर्षी दुष्काळ परस्थिती असुन जास्त दंडाच्या पावत्या वारंवार न फाडता आपणही या रीक्षावाल्यांना सहकार्य करावे असे सांगितले तसेच अकलुजचे सरपंच शिवतेजसिंह मोहीते पाटील यांचीही रीक्षाचालकांनी ग्रिन फींगर्स येथे भेट घेतली यावेळी त्यांनी चर्चा करून रीक्षाचालकांचे प्रश्न मार्गी लावु असे सांगितले.

यावेळी खुडूस निमगावपाटी पिसेवाडी विजयवाडी निमगाव आदी गावातींल रीक्षाचालक उपस्थित होते

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *