सदगुरु साखर करखान्या तर्फे मोफत सर्व रोग निदान,उपचार व रक्तदान शिबीर संपन्न…!
पिलीव प्रतिनिधी
सोलापूर,सांगली व सातारा जिल्याच्या शेतकऱ्यांना दुष्काळी परिस्थिती मधे सुद्धा अनेक बाबींनी वरदायनी ठरलेल्या सद्गुरू श्री श्री साखर कारखान्या मध्ये कारखाना व पुण्य श्लोक अहिल्यादेवी होळकर मेडिकल असोसिएशन (पद्मा) यांच्या सयुक्त विध्यमाने चेअरमन एन शेषगिरीराव ,व्हाईस चेअरमन बाळासाहेब कर्णवर पाटील,व संचालक श्रावण वाकसे,सतीश दडस यांच्या वाढदिवसाचे अवचैत्य साधून मोफत सर्व रोग निदान उपचार व रक्त दान शिबिराचे आयोजन केले होते.याचे उदघाटन व तीन लाख तीन हजार तीनशे एकावन्न साखर पोत्याचे पूजन सर्व संचालक मंडळ व मान्यवरांच्या हस्ते उपस्थिती मध्ये डॉ केशवराव काळे (हृदयरोग तज्ञ) यांच्या हस्ते करण्यात आले .
सदर शिबिराला व कार्यक्रमाला माळशिरस ,माण , आटपाडी,सांगोला तालुक्यातून सुरवाती पासूनच मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळाला रक्त दात्यांची संख्या एकशे दोन तर इतर रुग्णांची संख्या चारशे तीस अशी झाली आहे.या उपक्रमामुळे या ग्रामीण भागातील असंख्य गोर गरीब लाभार्थीना लाभ झाल्याचे बोलले जात आहे.
शिबिरानंतर सत्कार मूर्ती एन शेषगिरीराव, बाळासाहेब कर्णवर पाटील , श्रावण वाक्षे ,सतीश दडस यांचे सुवासिनींनी औक्षण केले तर असंख्य नागरिकांनी पुष्पहार फेटे बांधून शुभचिंतन केले.
सत्काराला उत्तर देताना एन शेषगिरीराव, बाळासाहेब कर्णवर पाटील,श्रावन वाक्षे व सतीश दडस यांनी कृज्ञता व्यक्त करून हा सद्गुरू कारखाना कायम स्वरूपी शेतकरी सामाजिक कार्य धार्मिक कार्य या बाबत अनेक नावीन्य पूर्ण कार्यक्रम राबवणार असल्याची ग्वाही दिली .
सदर कार्यक्रमासाठी डॉ अभिमन्यू टकले, संचालिका उषाताई मारकड, मोहन आप्पा बागल,नानासो कर्णवर,पिलीव चे नवनिर्वाचित सरपंच नितीन मोहिते,पंढरपूर ब्लड बँकेचे कर्मचारी, माण गंगा परमेडिकल कॉलेज चे स्टाफ तसेच आस पास च्या गावचे सरपंच उपसरपंच ,लोकप्रतिनिधी पत्रकार बंधू व जनरल मॅनेजर नागेश राव व कारखान्याचे सर्व खाते प्रमुख पदाधिकारी,अधिकारी कर्मचारी उपस्थित होते
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुनील सावंत यांनी केले.