पिलीव येथे शिव सेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची जयंती उत्सहात साजरी
पिलीव/सुजित सातपुते
शिवसेनाप्रमुख स्वर्गीय,हिंदू ह्रदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांची जयंती माळशिरस तालुक्यातील पिलीव येथे शिवसेना शाखेच्यावतीने उत्साहात विविध उपक्रम राबविण्यात येऊन साजरी करण्यात आली.यावेळी प्रतिमेचे पूजन, शिवसेनेचे माजी जिल्हाउपप्रमुख, अशोकभाऊ घोंगडे,शहराध्यक्ष विक्रम भैस, शिवराज पुकळे, शामदादा लेंगरे तानाजी श़िंदे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी दादा मदने, शिवराज पुकळे, अरूण घोंगडे, संजय घोंगडे,गणेश लोखंडे, कैलास घोंगडे, तानाजी शिंदे, अजित शिंदे उपस्थित होते. यावेळी फटाक्याची आतषबाजी करून पूर्ण गावातून जिलेबीचे वाटप मान्यवराच्या हस्ते करण्यात आले.