पिलीव येथील गोरख पिसे(माळी)यांचा आमरण उपोषणाचा इशारा…!

पिलीव/सुजित सातपुते
माळशिरस तालुक्यातील पिलीव येथील गोरख दादा पिसे(माळी)यांनी रस्त्यासाठी माळशिरस तहसिल कार्यालयासमोर शनिवार दिनांक 26 जानेवारी 2019 रोजी आमरण उपोषणास बसणार असल्याचा इशारा दिला आहे.या प्रकरणाची सविस्तर माहिती अशी की गोरख दादा पिसे यांची शेत जमीन मौजे पिलीव येथे असून त्यासी जुना सर्व्हे नं. 233 व 234 च्या बांधावरुण सर्वे नं. 234 या हिस्य्यातील गट नं. १०७२ मध्ये जाणे-येणे साठी रस्ता नसल्याने माळशिरस मा.तहसिलदार साहेब यांचेकडे अर्ज सादर केला होता.त्यानुसार निकाल लागून रस्ताही मंजूर झाला होता.परंतु विरोधी पक्षकाराने प्रांत कार्यालयाकडे अपील केल्याने प्रांत कार्यालयाडून सदरचे प्रकरण पुन्हां फेर चौकशीसाठी तहसिल कार्यालय माळशिरस यांच्याकडे पाठविण्यात आले व सदर प्रकरणाची पुन्हां चौकशी करुन पंचनामा करण्यात आला.व पुन्हां”तारीख पे तारीख सुरु झाली व मा.तहसिलदारांनी मंजुरी दिलेल्या रस्त्याचा प्रश्न प्रलंबित राहीला.मी सदर प्रकरणासंदर्भात सबळ लेखी पुरावे सोबत जोडले असूनही मला अद्यापर्यंत रस्ता मिळाला नाही.त्यामुळे माझे अतोनात हाल होत असल्याने मी जनावरांसहीत सह परिवार घेवून दिनांक 26 जानेवारी 2019 रोजी सकाळी 7:30 वाजल्या पासून माळशिरस येथील तहसील कार्यालयासमोर आमरण उपोषणास बसणार असून मला न्याय मिळेपर्यंत मी उपोषणावर ठाम राहणार असल्याचे गोरख पिसे यांनी पत्रकारांशी बोलताना संगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *