रामभाऊ वाघमारे यांना सोलापूरातील क्रांतीवीर लहुजी क्रांती भूषण पुरस्कार जाहीर
टेंभुर्णी/प्रतिनीधी
क्रांतीवीर लहुजी शक्ती सेना व क्रांतीवीर लहुजी वस्ताद तरुण मंडळ सोलापूर यांच्या वातीने देण्यात येणारा लहुजी क्रांती भूषण पुरस्कार टेंभुर्णी येथील सोलापूर काँग्रेसचे जिल्हा सरचिटणीस व मातंग एकता आंदोलन संघटनेचे जिल्हाध्यक्ष मा.रामभाऊ वाघमारे यांना जाहीर झाला असून १४ जानेवारी सोलापूरातील लष्कर येथील साळवे नगर मध्ये माजी केंद्रीय गृहमञी सुशिलकुमारजी शिंदे साहेब यांचे हस्ते आणि आ.सिद्धराम म्हेञे आमदार प्रणीती शिंदे,जयराज भोसले,शहराध्यक्ष प्रकाश वाले,अरुण वर्मा यांचे उपस्थितीत पुरस्काराने गौरवण्यात येणार आहे येणार असुनन गौरवचिन्ह,शाल,श्रीफळ व महापुरुषाचे चरित्रग्रंथ देण्यात येणार असल्याची माहीती संयोजक सुरेश पाटोळे यांनी दिली.