अकलुज येथील होलार समाजातील तरुणाने केले बौध्द पध्दतीने लग्न…!

पिलीव/सुजित सातपुते
माळशिरस तालुक्यातील होलार समाजातील आंबेडकरी चळवळीचे नेते दादासाहेब नामदास यांचा मुलगा चि.शिवदत्त नामदास रा.अकलुज व अंकुश माने यांची मुलगी चि.सौ.का राजश्री माने रा.दौंड यांनी आज माळशिरस तालुक्यातील आंबेडकरी चळवळीच्या स्वाभिमानी नेत्यांच्या व कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत माळशिरस येथील नालंदा बौध्द विहारामध्ये दोघेही होलार समाजाचे आसताना बौध्द पध्दतीने विवाह केला.हा विवाह करुन शिवदत्तने जाती-पातीचे राजकारण करणार्या जातीयवाद्यांना”सर्व धर्म समभाव”हे वाक्य कृतीत उतरवून दाखविले आहे.सदरचा विवाह म्हणजे अवघ्या महाराष्ट्रातीलच नव्हे तर अखंड भारत देशातील पहीलाच विवाह असेल कि होलार समाजाचे असतानासुध्दा कोणताही धर्मभेद न करता बौध्द विहारामध्ये आणि ते सुध्दा बौध्द पध्दतीने विवाह करणे.या विवाह प्रसंगी रिपाइं जिल्हा उपाध्यक्ष विकासदादा धाईंजे,युवकचे तालुकाध्यक्ष किरणतात्या धाईंजे,सतीशनाना पालकर,पत्रकार सचिन करडे,नटराज कांबळे व नामदास-माने परिवारातील सर्व सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.या ऐतिहासिक निर्णयामुळे उपासक व उपासिकेचे सर्वच स्तरातून कौतुक व अभिनंदन होत असून रविवार दिनांक 13 जानेवारी रोजी पिलीव येथील आंबेडकरी चळवळीच्या कार्यकर्त्यांनी शिवदत्त व राजश्री यांचा रिपाइं चे जिल्हा उपाध्यक्ष विकासदादा धाईंजे यांचे हस्ते सत्कार व कौतुक समारंभाचे जंगी आयोजन केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *