श्री व सौ डॉ.पवार दाम्पत्यांची सामाजिक बांधिलकी…!

पिलीव/सुजित सातपुते
माळशिरस तालुक्यात दुष्काळी गावातून पिण्याच्या व जनावराच्या पाण्याचा प्रश्न गंभीर बनत चालला आहे. सुळेवाडी येथे गावाला पाणीपुरवठा करणार्या विहिरीची पाणीपातळी एकदमच खालाऊ लागलेने पिण्याच्या पाण्याची पर्यायी व्यवस्था लोकसहभागातून करण्यात आली आहे.फॉरेस्ट लगत आसलेल्या अमोल दडस व शिवाजीराव दडस यांच्या विहिरीपासून 2200 फुट पाईपलाईनला जोडून कमी पडत असलेली 800फूट लांबीचीpvcपाईप लाईन व लागणारे साहित्य सुमारे पन्नास हजार रुपये कीमतीचे लोकसहभागातून वर्गणीच्या स्वरुपात घेऊन लोकांची पिण्याच्या पाण्याची गरज भागविण्यात आली आहे. विशेष म्हणजे मँरेथाँन स्पर्धेत बक्षीस मिळालेली रक्कम रु.7000 व त्यात स्वताचे तीन हजार रुपये टाकून पिलीव येथील नामांकित डॉ.सौ.वंदना पवार यांनी रु10000देणगी दिली आशा सर्व देणगीदारांचा सन्मान माजी सभापती संग्रामसिंह जहागिरदार यांचे हस्ते सुळेवाडी ग्रामपंचायतीच्यावतीने करण्यात आला.अध्यक्षस्थानी जि.प.सदस्य गणेश पाटील होते.यावेळी देणगीदार डॉ.दिलीप पवार,हणमंत सुळे,संजय सुळे, विमाप्रतिनिधी, दत्तू भैस,जि.प.शाळा शिक्षकवर्ग,कृषी खात्याचे मंडल अधिकारी मोहिते,सहाय्यक नितिन शिंदे,अंकूश शिंदे,ग्रामसेविका शेख मँडम, मल्हारी सुळे, हिरा मोठे, विठ्ठल माने,विठ्ठलदयाजी फौंडेशन, म्हसवडचे उपनगराध्यक्ष महादेव मासाळ, यांचा सत्कार करण्यात आला, यावेळी बोलताना संग्रामसिंह जहागिरदार यानी देणगीदारांचे व ग्रामपंचायतीने वेळीच उपाय केल्याचे कौतुक करुन इतर दुष्काळी भागातील गावांनी आनुकरण करुन आदर्श घेण्याचे आवाहन केले, यावेळी गणेश पाटील यांनी मनोगत व्यक्त केले सुत्रसंचलन विठ्ठल सुळे यांनी तर आभारप्रदर्शन उपसरपंच अनिल सोलंकर यानी मानले, यावेळी सरपंच सौ.मालन लोखंडे, उपसरपंच, अनिल सोलंकरा,दुर्योधन सोलंकर क्रष्णा सुळे, विठ्ठल करे, प्रदीप सुळे, दुर्वा बिडे, सुनिल खुर्द,यानी परिश्रम घेतले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *