पीपल्स रिपब्लिकन पार्टीच्या युवक तालुका संपर्क प्रमुखपदी शिवम गायकवाड यांची निवड

पिलीव/सुजित सातपुते
राष्ट्रिय अध्यक्ष,आदरणीय आमदार प्राध्यापक जोगेन्द्रजी कवाडे सर,राष्ट्रिय कार्याध्यक्ष आदरणीय जयदिपभाई कवाडे,राज्य उपाध्यक्ष आदरणीय राजाभाऊ इंगळे यांच्या पीपल्स रिपब्लिकन पार्टीच्या माळशिरस तालुका युवक संपर्क प्रमुखपदी आंबेडकरनगर अकलूज येथील शिवम सिद्धार्थ गायकवाड यांची निवड सोलापूर जिल्हाध्यक्ष सोमनाथ भोसले यांच्या आदेशाने तालुकाध्यक्ष बॉबी वाघमारे,कार्याध्यक्ष सुहास गायकवाड,युवक तालुकाध्यक्ष गुरु गायकवाड यांनी केली.
अकलूज येथील शासकीय विश्रामगृह येथे जिल्हाध्यक्ष सोमनाथ भोसले यांच्या उपस्थितीत हि निवड करण्यात आली.शिवम गायकवाड यांनी आजपर्यंत वेगवेगळी सामाजिक कार्ये केली असल्याने व युवक वर्गात चांगला संपर्क असल्याने तालुकाध्यक्ष बॉबी वाघमारे,कार्याध्यक्ष सुहास गायकवाड व युवक तालुकाध्यक्ष गुरु गायकवाड यांनी त्यांची माळशिरस तालुका युवक संपर्क प्रमुखपदी निवड करून निवडीचे पत्र दिले.
निवडीला उत्तर देताना शिवम गायकवाड म्हणाले कि पक्षाने माझ्यावर दिलेली जबाबदारी मी नक्कीच पूर्ण करेन माळशिरस तालुक्यात युवकांच्या माध्यमातून पीपल्स रिपब्लिकन पार्टीच्या शाखा काढून पक्षाची ताकद आणखी वाढवणार असल्याचे सांगितले.
यावेळी शिवाजी खडतरे,अक्षय जाधव,अजिंक्य गायकवाड,मयूर माने,निलेश लोखंडे,किरण धनवडे,शाहरुख कुरेशी,लखन साळवे,शुभम गायकवाड,शुभम बगाडे,गणेश साळवे यांचेसह कार्यकर्ते उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *