सभापती सौ.वैष्णवीदेवी मोहीते-पाटील यांच्या हस्ते पालकमंत्री व जिल्हाधिकारी यांना निवेदन


सचिन करडे/खुडूस

माळशिरस तालुक्यातील टंचाई गावांना पाणी टँकर व चारा छावण्या सुरू करण्यासाठी मा. पालकमंत्री विजयकुमार देशमुख व जिल्हा अधिकारी राजेंद्र भोसले यांना पंचायत समिती सभापती सौ. वैष्णवीदेवी अर्जुनसिंह मोहिते पाटील यांच्या हस्ते निवेदन देण्यात आले.
मागिल काही दिवसांपूर्वी माळशिरस विकास गटाकडे टंचाई सदृश्य परिस्थिती निर्माणमी झाली आहे. शासनाने माळशिरस तालुका टंचाईग्रस्त जाहीर केला आहे. भांब , रेडे जळबावी गारवाड शिगोर्णी बचेरी फडतरी या गावामध्ये पिण्यायोग्य पाण्याची भिषण पाण्याची टंचाई जाणवू लागली आहे तसेच अनेक दुभती जनावरे ही पाणी व चार्या अभावी दगावली आहेत त्यामुळे या गावांना पाणी टँकर व चारा छावण्या लवकरात लवकर चालु करण्याचे निवेदन देण्यात आले . हे निवेदन देताना जिल्हा परिषद सदस्य बाळासाहेब धाईजे , अरुण तोडकर, पंचायत समिती सदस्य प्रतापराव पाटील हे उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *