दै.पुढारी पिलीवचे पत्रकार दामोदर लोखंडे यांना युवासेनेच्या वतीने आदर्श पत्रकार पुरस्कार प्रदान…!
पिलीव/सुजित सातपुते
माळशिरस तालका शिवसेना व अकलुज शहर युवासेनेच्यावतीने विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणार्या आदर्श व्यक्तीना, पुरस्कार देऊन त्यांना, ट्राफी, शाल, श्रीफल, व सन्मानपत्र देऊन गौरविण्यात येते, त्याप्रमाणे दै.पुढारीचे पिलीवचे, वार्ताहर, दामोदर लोखडे, माळीनगरचे वार्ताहर, गोपाळ लावंड, पुण्यनगरीचे भरत मोरे व माळीनगरचे प्रतिनिधी, रितेश पांढरे याना आदर्श पत्रकार पुरस्कार देऊन गौरविण्यात आले, यावेळी, राजाभाऊ खिलारे,कार्यक्रमाचे अध्यक्ष सुजयसिंह।भैय्या।माने पाटील, विक्रम पराडे पाटील,महेश इंगळे, शिवाजी इंगवले. देशमुख, शहराध्यक्ष शेखभैय्या खिलारे, व पत्रकार चंद्रकांत कुंभार, भारत मगर ,सौ.ज्योतीताई कुंभार, नागेश लोंढे व इतर अनेक मान्वर उपस्थित होते, यावेळी, प्रास्ताविक शेखरभैय्या खिलारे यानी, तर पत्रकार मरत मोरे, अध्यक्ष सुजयसिंह मानेपाटील यानी आपल्या मनोगतात समाजातील उल्लेखनिय कार्य करत असतात त्यांची अचूकपणे निवड करून, निय़ोजन कार्यक्रम आयोजित केला त्याबद्ल संय़ोजकाचे कौतुक केले, भरत मोरे यांनी ही मनोगत व्यक्त केले तर राजाभाऊ खिलारे यानी आभार मानले व त्यानी लिहिलेल्या वांझवडा रा पुस्तकाचेही वाटप करण्यात आले.