युवासेनेच्या वतीने सामाजिक क्षेत्रात उत्कृष्ट कार्य करणाऱ्या व्यक्तींचा पुरस्कार कार्यक्रम संपन्न
अकलुज/प्रतिनीधी
माळशिरस तालुक्यातील व सोलापूर जिल्ह्यातील सामाजिक, राजकीय,सांस्कृतिक,आर्थिक,राजकीय क्षेत्रात आपल्या कार्य कर्तृत्वाचा ठसा उमटवत जनतेच्या प्रश्नांवर लढणाऱ्या व त्यांना न्याय देण्यासाठी सतत धडपडणाऱ्या व्यक्तींना प्रोत्साहन देण्यासाठी युवासेना माळशिरस तालुका व अकलूज शहराच्या वतीने
पुरस्काराचे वितरण
धवल श्रीराम मंदिर अकलूज येथे मान्यवरांच्या हस्ते पुरस्कार प्राप्त व्यक्तींना पुरस्कार प्रदान करण्यात आला यावेळी शेखरभैया खिलारे यांनी प्रास्ताविक केले या पुरस्काराचे संयोजन शेखरभैया खिलारे व गणेशदादा इंगळे यांनी माळसिरस तालुका युवासेना व अकलुज शहर युवासेनाच्या वतीने केले होते
सदर पुरस्कार विविध क्षेत्रातील उत्कृष्ट कार्य करणारे व्यक्ति याप्रमाणे आदर्श पत्रकार भरतकुमार मोरे ,रितेश पांढरे, दामु लोखंडे,गोपाळ लावंड,गुणवंत शिक्षक दिलीप वाघमारे,आदर्श व्यक्ति नितीन कुदळे,आदर्श समाजसेवक विजय कुलकर्णी,जीवनगौरव पुरस्कार डॉ अनिकेत इनामदार,डॉ समीर बंडगर , गुणवंत विद्यार्थी पुरस्कार किरण भांगे,उत्कृष्ट युवा कार्यकर्ते पुरस्कार महेश इंगळे,सुरेशभाऊ टेळे,तसेच उत्कृष्ट भारुडसम्राट ह भ प सावता फुले,किशोर लोखंडे आदर्श संस्था गिता प्रतिष्ठान आदिंना २०१९ चे पुरस्कार जाहीर करण्यात आले असून सन्मानचिन्ह,शाल,श्रीफळ सन्मानपत्र असे पुरस्कार देण्यात आले .
या पुरस्कार वितरण सोहळ्यासाठी शिवसेना नेते डॉ धवलसिंह मोहीते पाटील, युवानेते उद्योजक सुजितभैया माने पाटील,जनसेवा संघटनेचे जिल्हाध्यक्ष शिवाजीराव इंगवले,विद्याताई एखतपुरे बबनराव खंडागळे महादेव बंडगर ग्राहक संरक्षण शिवसेना ता प्रमुख ज्योतीताई कुंभार,ता उपप्रमुख,सचिन कुपाडे जिल्हा प्रमुख योद्धा प्रतिष्ठान,सुरेश गंभीरे,अजित गांधी अकलूज शहर प्रमुख, सज्जन लोखंडे स्नेहल हेंद्रे आदी मान्यवरांच्या हस्ते पुरस्कार प्रदान करण्यात आले प्रसंगी सामाजिक क्षेत्रात कार्य करणाऱ्या व्यक्तींचा युवानेते सोनुभैया पराडे,रघुनाथ साठे यांचा सत्कार करण्यात येणार आला तसेच मान्यवरांच्या हस्ते गरजू महिलांना साडी वाटप करण्यात आल्या सुजितभैया माने पाटील ,राजाभाऊ खिलारे महादेव बंडगर शेखर खिलारे यांनी मनोगत व्यक्त केले
सदर कार्यक्रमासाठी विराट आहेर,विकी गायकवाड,राजाभाऊ जाधव निखिल शिरसट नितिन ढावरे सागर खंडागळे सचिन भोसले,गणेश भिताडे सचिन खिलारे,बिपिन बोरावके,आकाश बगाडे संकेत चकरे यांनी परिश्रम घेतले बहुसंख्येने पत्रकार बांधवांसह युवासैनिक,महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते या कार्यक्रमासाठी उपस्थितांचे आभार बिपीन बोरावके यांनी मानले प्रचंड गर्दी झाली होती